Gall Bladder Stone : ‘या’ 4 घरगुती उपायांनी दूर करा पित्ताशयातील खड्यांची समस्या

पित्ताशय म्हणजे गॉलब्लॅडर, शरीराचा एक छोटा अवयव आहे, जो लीव्हरच्या अगदी पाठीमागे असतो. अनेकदा पित्ताशयात कोलेस्ट्रॉल, बिलीरुबिन आणि पित्त लवण जमा होते. ऐंशी टक्के खडे कोलेस्ट्रॉलपासून तयार होतात. हळु-हळु ते कठीण होतात. यावर डॉक्टर ऑपरेशनचाच उपचार सांगतात. परंतु, पित्तखड्यावर घरगुती उपाय सुद्धा शक्य आहेत. जाणून घेऊयात कोणते उपाय आहेत…

1 संत्रे/मोसंमी/ टोमॅटो
अशा फळांचा ज्यूस पिऊ शकता, ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्याप्रमाणात असते. जसे की, टोमॅटो, संत्रे इत्यादी. यातील व्हिटॅमिन सी कोलेस्ट्रॉलला पित्त अम्लमध्ये परावर्तीत करतात, जे पित्तखडे तोडून बाहेर काढते.

2 गाजर आणि काकडीचा रस
गाजर आणि काकडीचा रस प्रत्येकी 100 मिलिलीटरच्या मात्रेत मिसळून दिवसात दोन वेळा प्या. हा या समस्येवरील लाभदायक घरगुती उपाय मानला जातो. हे कॉलेस्ट्रॉलच्या कडक प्रकाराला नरम करून बाहेर काढण्यास मदत करते.

Advt.

3 हळद
पित्तखड्यावर हळद गुणकारी आहे. ही अँटी-ऑक्सीडेंट आणि अ‍ॅटी-इन्फ्लेमेट्री असते. असे मानल जाते की, एक चमचा हळद घेतल्याने सुमारे 80 टक्के खेडे नष्ट होतात.

4 अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर
अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरची अम्ल प्रकृती लीवरला कोलेस्ट्रॉल बनवण्यापासून रोखते. यामुळे वेदना दूर होतात.

लक्षात ठेवा पित्ताच्या बाबतीत कोणताही घरगुती उपचार करण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.