Vaccination After COVID Recovery : जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह झाला आहात तर तुम्ही केव्हा घ्यावी लस, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुम्ही हा विचार करत असाल की तुम्ही कोरोनाशी युद्ध जिंकले आहे आणि तुमच्या शरीरात कोरोनाविरूद्ध अँटीबॉडी डेव्हलप झाली आहे, आणि आता पुन्हा कोरोना होणार नाही तर हा तुमचा गैरसमज आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा व्हॅक्सीन घेणे आवश्यक आहे. व्हॅक्सीन स्कीप करून तुम्ही तुमचा जीव धोक्यात टाकत आहात. कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर तुमच्या शरीरात तयार झालेली अँटीबॉडी किती दिवस राहील हे अजूनपर्यंत कुणीही सांगू शकत नाही, यासाठी स्वताला सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॅक्सीन घेणे आवश्यक आहे.

जर तुम्ही एक महिन्यापूर्वी रिकव्हर झाला आहात आणि व्हॅक्सीनबाबत तुमच्या मनात काही द्विधा असेल तर अस्वस्थ होऊ नका. तुम्हाला कोविड-19 चा संसर्ग होऊन गेला असेल, तरी सुद्धा तुम्हाला व्हॅक्सीन घेण्याची आवश्यकता आहे का? याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गंगा राम हॉस्पिटलचे सिनियर कन्सलटंट आणि व्हाईस चेयरमन क्रिटिकल केयर अँड इमर्जन्सीचे डॉक्टर प्रकाश एस. शास्त्री यांच्याकडून माहिती घेवूयात की, रिकव्हरी नंतर लस कधी घ्यावी.

रिकव्हरीनंतर अँटीबॉडी कधीपर्यंत राहील ?
जरी तुम्ही कोविड-19 शी युद्ध जिंकले असेल तरी मोठ्या कालावधीपर्यंत या व्हायरसपासून सुरक्षित राहू शकत नाही. डॉक्टर शास्त्री सांगतात रिकव्हरीनंतर अँटीबॉडी शरीरात किती दिवस राहते याचे अद्याप कोणतेही प्रमाण नाही.

रिकव्हरीनंतर किती दिवसानंतर व्हॅक्सीन घ्यावी ?
डॉक्टर शास्त्री यांच्यानुसार कोरोनातून रिकव्हर झाल्यानंतर तुम्ही एक महिन्याच्या आत कोरोनाची लस घेऊ शकता. रिकव्हर झाल्यानंतर बॉडी स्वताच अँटीबॉडी बनवते. कोरोनाचे गंभीर रूग्ण एक महिन्यानंतर किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर व्हॅक्सीन घेऊ शकतात. कोरोनातून रूग्ण बरा झाल्यानंतर टेस्ट करण्याची आवश्यकता नाही असेही डॉ. शास्त्री यांनी सांगितले.