वजन कमी करण्यासाठी काय खावे : नाश्त्यात खा 200 पेक्षासुद्धा कमी कॅलरीचे ‘हे’ 5 पदार्थ, वेगाने कमी होईल संपूर्ण शरीराची चरबी

पोलिसनामा ऑनलाइन – वजन वाढणे सध्या सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक समस्या आहे, जिचा अनेक लोक सामना करत आहेत. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार जसे की, डायबिटीज, हृदयरोग, किडनी आणि पोटाच्या रोगाचे कारण बनू शकते. आम्ही तुम्हाला काही अशा हेल्दी डिश (healthy diet ) सांगणार आ होत ज्यामध्ये 200 पेक्षा कमी कॅलरी असतात आणि इतर पोषकतत्व भरपूर असतात. रोज सकाळी नाश्त्यात हे पदार्थ सेवन केल्यास वजन नियंत्रित (healthy diet ) ठेवण्यात मदत होते.

ढोकळा
ही गुजराती डिश नाश्त्यासाठी एकदम योग्य आहे. बेसनापासून तयार केलेल्या ढोकळ्यात कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सारखी पोषकतत्व भरपूर असतात. मात्र, यातील साखरेपासून दूर राहावे. एका ढोकळ्यात केवळ 60 कॅलरी असतात.

रवा उपमा
रवा किंवा सूजीपासून बनवलेला उपमा हेल्दी आहे. यात फॅट कमी, कॅलरी कमी आणि फायबर उच्च असते. या गुणांमुळे हा वजन घटवणारा नाश्ता आहे. यात केवळ 192 कॅलरी असतात.

मूगडाळीचा चीला
चिला वजन कमी करण्याचा पर्याय आहे. केवळ तेल कमी वापरावे. एका चीलामध्ये केवळ 128 कॅलरी असतात.

रागी डोसा
रागी डोसा एक हेल्दी आणि टेस्टी ऑपशन आहे. यामध्ये आयर्न, फायबर, मॅग्नेशियम आणि विविध प्रकारचे व्हिटॅमिन भरपूर असतात. यामध्ये काही भाज्या मिसळू शकता. हे नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता. एका डोशात केवळ 132 कॅलरी असतात.

ओट्स इडली
ओट्स वजन कमी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. तांदळाच्या तुलनेत ओट्समध्ये जास्त फायबर आणि पोषकतत्व असतात. हा मँगेनीज, फास्फोरस, कॉपर, व्हिटॅमिन, आयर्न, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि झिंकचा चांगला स्त्रोत आहे. दाने इडलीत केवळ 60 कॅलरी असतात.

भाज्यांचा दलिया
दलिया दोन प्रकारे बनवता येतो, गोड किंवा साधा. साधा दलिया बनवण्यासाठी सुकामेवा आणि हिरव्या भाज्या वापरा. दोन्ही पद्धती चांगल्या आहेत. एक वाटी दलियामध्ये केवळ 174 कॅलरी असतात.