Heart Disease Risk By Your Blood Group | ‘या’ रक्तगटाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका असतो कमी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हृदयरोग (Heart Disease) ही एक जागतिक स्तरावरील मोठी आरोग्य समस्या आहे. जगात होणणार्‍या एकूण मृत्यूंमध्ये हे एक प्रमुख कारण मानले गेले आहे. अमेरिकेत दर ३६ सेकंदाला एका व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू होतो, असे आकडेवारी सांगते (Heart Disease Risk By Your Blood Group). भारतातही गेल्या काही वर्षांत कमी वयातच हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याच्या घटना अधिक नोंदल्या गेल्या आहेत. हृदयरोगाचा धोका व लक्षणे शोधून वेळीच उपचार सुरू केले तर त्यातून गंभीर रुग्ण व मृत्यूचा धोका बर्‍याच अंशी कमी होऊ शकतो, हृदयविकार आधीच कसे शोधायचे (Heart Disease Risk By Your Blood Group)?

 

संबंधित अभ्यासात संशोधकांच्या टीमने सांगितलं आहे की, ब्लड ग्रुपच्या आधारे तुम्ही हृदयरोगाचा धोकाही (Heart Disease Risk) जाणून घेऊ शकता. अभ्यासामध्ये, संशोधकांना असे आढळले आहे की ए आणि बी रक्तगट असलेल्या लोकांना थ्रोम्बोसिस होण्याचा धोका जास्त असू शकतो. थ्रोम्बोसिसची स्थिती, ज्याला रक्तवाहिनी किंवा नसांमध्ये गोठणे म्हणतात. गुठळ्या तयार झाल्यामुळे, हृदयाला रक्त पंप करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे विविध प्रकारच्या आजारांचा धोका उद्भवू शकतो. हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया (Heart Disease Risk By Your Blood Group).

 

जाणून घ्या हृदयरोगाचा धोका (Know The Risk Of Heart Disease) :
इसवी सन २०२० च्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रक्तगट ए आणि बी (Blood groups A And B) असलेल्या व्यक्तींना थ्रोम्बोलिटिक रोग होण्याचा धोका जास्त असतो. परंतु ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींपेक्षा उच्च रक्तदाबाचा धोका कमी असतो.

शास्त्रज्ञांना असे आढळले की ए रक्तगट असलेल्या व्यक्तींना ओ रक्तगट असलेल्या व्यक्तींपेक्षा हायपरलिपिडेमिया, एथेरोस्क्लेरोसिस आणि हृदय अपयशाचा धोका (Risk Of Hyperlipidemia, Atherosclerosis And Heart Failure) जास्त असतो. त्याच वेळी, बी रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये मायोकार्डियल इन्फार्क्शनचा धोका जास्त असल्याचे आढळले. या परिस्थितीत हृदयाच्या स्नायूंच्या एक किंवा अधिक भागांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.

 

कोणत्या रक्तगटाला धोका जास्त (Which Blood Group Is Most At Risk) :
शास्त्रज्ञांना असे आढळले की ए रक्तगट असलेल्यांना हृदयविकार, एथेरोस्क्लेरोसिस, हायपरलिपिडेमिया, अ‍ॅटोपी, स्लीप एपनिया होण्याचा धोका जास्त असू शकतो. वेगवेगळ्या रक्तगटांचा दुवा आणि हृदयरोगाच्या धोक्याविषयी संशोधकांचे म्हणणे आहे की, ए रक्तगटांमधील नॉन-विलेब्रँड घटकाच्या प्रमाणातील फरकामुळे हे घडले आहे. नॉन-विलेब्रँड फॅक्टर एक प्रोटीन आहे, जो रक्ताच्या गुठळ्या तयार करतो. रक्ताच्या गुठळ्या या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारातील एक प्रमुख घटक आहे.

 

हृदयरोगाच्या जोखमीचे कारण (Causes Of Heart Disease Risk) :
संशोधनात असे आढळले आहे की नॉन-विलेब्रँड फॅक्टरचे प्रमाण जास्त असल्यामुळे,
ओ रक्तगट नसलेल्या लोकांना ओ रक्तगट असलेल्यांपेक्षा रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते.
तथापि, या व्यतिरिक्त, या अभ्यासानुसार असेही दिसून आले आहे की ओ रक्तगट नसलेल्या लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव आणि उच्च रक्तदाब कमी होण्याचा धोका कमी असतो.

प्रतिबंधात्मक उपाय आवश्यक (Preventive Measures Required) :
अभ्यासाच्या निष्कर्षात, संशोधकांनी नोंदवले की, ओ रक्तगट नसलेल्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असल्याचे आढळले.
ओ रक्तगट असलेल्यांचे वय इतर रक्तगट असलेल्यांपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की या अभ्यासाची पुष्टी करण्यासाठी, वेगवेगळ्या रक्तगट असलेल्या व्यक्तींवर अधिक तपशीलवार संशोधन आवश्यक आहे.
ओ रक्तगट असलेल्या व्यक्ती हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांपासून सुरक्षित असतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Heart Disease Risk By Your Blood Group | know heart disease risk by your blood group study says blood group a and b were at higher risk

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या

 

Vitamin Rich Foods | केस, नखे आणि त्वचेसाठी अप्रतिम आहेत ‘या’ 8 गोष्टी; आहारात करा समाविष्ट, जाणून घ्या

 

Weight Loss Drink | वजन कमी करण्यासाठी रोज उपाशीपोटी ‘हे’ पाणी प्या, होईल नक्की फायदा; जाणून घ्या