Heart Health | कमी वयात का वाढत आहे ‘हार्ट अटॅक’ची प्रकरणे, जाणून घ्या ‘ही’ महत्वाची 5 कारणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Heart Health | खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (Bad Eating Habits) आणि तणावामुळे (Stress) लहान वयातच लोकांना हृदयविकार (Heart Disease) होण्याची शक्यता असते. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आणि महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. हृदयविकाराचा झटका ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे शरीरातील नसांमध्ये रक्त प्रवाह (Blood Flow) सुरळीत होत नाही आणि रक्त गोठण्याची समस्या (Blood Clots) उद्भवते ज्याला क्लॉटिंग (Clotting) देखील म्हणतात (Healthy Heart).

 

या क्लॉटिंगमुळे रक्त हृदयापर्यंत पोहोचणे कठीण होते. हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा (Oxygen Supply) कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

 

कमी वयात हार्ट अटॅकची कारणे (Causes Of Heart attacks in younger age) :
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लहान वयातच लोकांना हृदयविकाराचा धोका निर्माण होतो. तरुणांमध्ये हृदयरोग आणि हार्ट अटॅकचे प्रमुख कारण धूम्रपान असल्याचे समोर आले आहे. तरूण वयात हृदयविकाराचा झटका (Heart Health) येण्याची कारणे कोणती ते जाणून घेऊया…

 

मादक पदार्थांचे सेवन (Drug Abuse) :
हृदयविकाराचे सर्वात मोठे कारण मादक पदार्थांचे सेवन करणे आहे. जास्त दारू (Alcohol) प्यायल्याने किंवा ड्रग्स (Drugs) घेतल्याने रक्तदाब वाढतो. बीपी (BP) वाढण्याचा थेट परिणाम रक्तवाहिन्यांवर होतो, ज्यामुळे हृदय पंपिंग करण्यास सुरूवात करते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.

मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन (Consumption Of Spicy And Oily Foods) :
जिभेच्या चवीसमोर आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम हृदयाचे आरोग्य बिघडण्यात होते.
आहारातील तळलेले आणि मसालेदार पदार्थ (Fried And Spicy Food) आपले आरोग्य बिघडवत आहेत.
या पदार्थांमुळे शरीरातील कॅलरीजचे (Calories) प्रमाण वाढते आणि हृदयाचे आरोग्य बिघडते.

 

तणाव हृदयासाठी धोका (Stress and Heart Health) :
लहान मुलांपासून मोठे आणि वृद्धांपर्यंत तणाव वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होत आहे.
हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तणावापासून दूर राहा.

 

लठ्ठपणा हार्ट अटॅकचे कारण (Obesity and Cardiovascular Disease) :
वाढत्या लठ्ठपणामुळे (Obesity) हृदयविकाराचा झटकाही येतो. शरीरातील अतिरीक्त चरबी नसांच्या बाजूला साचू लागते, त्यामुळे नसा अरुंद होऊ लागतात. त्यामुळे रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह सुरळीत होत नाही, त्यामुळे रक्त गोठण्याचा धोका वाढतो. या स्थितीमुळे हार्ट अटॅक येतो.

 

मेटाबॉलिक सिंड्रोमसुद्धा हार्ट अटॅकचे कारण (Metabolic Syndrome) :
मेटाबॉलिक सिंड्रोम (Metabolic Syndrome) म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती लठ्ठपणा, हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) किंवा शुगरशी (Sugar) झुंज देत असतो, तेव्हा अशा स्थितीला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात जी हार्ट अटॅकच्या जोखमीसाठी जबाबदार असते.

 

Web Title :- Heart Health | know the 5 reasons of heart attack at young age

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ शेअरने दिला दोन वर्षात 10 पट रिटर्न, तुमच्याकडे आहे का हा शेअर

 

Shamita Shetty And Rakesh Bapat Breakup | बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि मराठमोळा अभिनेता राकेश बापट यांचं ब्रेकअप झालं? शमिताने केला खुलासा म्हणाली…

 

Manjit Singh Virdi Foundation | मनजित सिंग विरदी फाऊंडेशनच्या वतीने महिलादिनानिमित्त ‘त्या’ महिलांना दाखवण्यात आला ‘गंगुबाई काठियावाडी’