Heatstroke-Maharashtra | अलर्ट! उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताचे रुग्ण वाढले, राज्यात 13 रुग्णांची नोंद, अशी घ्या काळजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Heatstroke-Maharashtra | राज्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. राज्यात १ ते २० मार्च या काळात उष्माघाताच्या १३ रुग्णांची नोंद झाली. यापैकी बीडमध्ये (Beed) सर्वाधिक ४ रुग्ण आहेत. तर रायगड (Raigad) जिल्ह्यात दोन आणि अहमदनगर, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, सातारा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. मात्र, सुदैवाने अद्याप उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.(Heatstroke-Maharashtra)

उन्हाची तीव्रता वाढल्याने आणि उष्माघाताचे रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

याबाबत आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, राज्यात अनेक भागात उष्णतेचे प्रमाण वाढले असून उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासाठी आरोग्य यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याबद्दलही सूचना केल्या आहेत.

डॉ. पवार म्हणाले, उष्णतेशी निगडित आजार वाढण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी उपचाराचे नियोजन करावे. औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. या आजारांवरील उपचारांचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यावे. लहान मुले आणि ज्येष्ठांची काळजी घेण्याबाबत जनजागृती करावी. उष्माघातापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती जनतेला द्यावी, असे निर्देश दिले आहेत.

असे करा उष्माघातापासून संरक्षण –

  • दिवसभरात भरपूर पाणी प्या
  • कॅफीनयुक्त पेये अथवा मद्य टाळा
  • तीव्र उन्हात जाणे टाळा
  • सौम्य रंगाचे सुती कपडे वापरा
  • लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्या
  • पंखे आणि एसी वापरा
  • दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Punit Balan Group | उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना भेट! (Video)

Sanjay Kakade | ‘राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माझ्या वेदना व पुणे लोकसभेचे वास्तव मांडले’ – माजी खासदार संजय काकडे

Sharad Pawar NCP Group On Ajit Pawar | शरद पवार गटाची अजित पवारांवर खोचक टीका, ”…तर जुलमी सत्तेचं मांडलिकत्व स्वीकारावं लागत नाही, धाकदपट’शहां’ची…” (Video)

Rohit Pawar On Sunil Tatkare | रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर घणाघात, अजित पवारांची साथ सोडणारे ते पहिले व्यक्ती असतील

Bacchu Kadu On Navneet Rana | ”नवनीत राणांचा पराभव करणार”, उमेदवारी दिल्याने बच्चू कडू भाजपावर संतापले