Helmet Compliance In Pune | कोण म्हणतेय पुणे शहरात हेल्मेट सक्ती नाही ! गतवर्षभरात हेल्मेट परिधान न करणार्‍या 4 लाख दुचाकीस्वारांना दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Helmet Compliance In Pune | पूर्वी चौका चौकात वाहतूक पोलिसांकडे जितकी कारवाई केली जात होती़ त्यापेक्षा अधिक कारवाई विना हेल्मेट धारक दुचाकीस्वारांवर सीसीटीव्ही मार्फत केली जात आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत सुमारे ४ लाखांहून अधिक वाहनचालकांवर विनाहेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३६ कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. (Pune Traffic Police)

पुणे शहर पोलीस दलाचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (IPS Amitesh Kumar) यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांना पुण्यातील वाहतूकीविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यात सहाजिकच हेल्मेटबाबत पुणेकर अधिक सजग आहेत. पुण्यात हेल्मेटसक्ती होणार का असे विचारण्यात आले. त्यावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूकीचे नियम नागरिकांनी पाळावेत. हेल्मेटचा वापर करावा असे म्हटले होते. प्रत्यक्षात शहरात हेल्मेट सक्ती आजही सुरु आहे. (Helmet Compliance In Pune)

हेल्मेटसक्तीबाबत पुण्यात काही वर्षांपूर्वी जोरदार आंदोलने झाली होती. वाहतूक पोलीस चौकाचौकात वाहन चालकांना अडवून त्यांच्यावर कारवाई करत असत. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपच्याच आमदार व नेत्यांनी याबाबत तक्रारी केल्या. वाहतूक पोलीस चौका चौकात वाहने अडवित असल्याने चौकांमध्ये वाहतूक कोंडी होते. त्यावर त्यांनी पोलिसांनी चौकात कारवाई न करता सीसीटीव्हीमार्फत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गेली ५ वर्षे सीसीटीव्ही मार्फत विना हेल्मेट दुचाकीधारकावर कारवाई केली जात आहे.

सध्या येरवडा येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयातून शहरभरातील चौका चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीद्वारे विना हेल्मेटधारक दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे.
या सीसीटीव्ही मार्फत विना हेल्मेट आणि झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणार्‍यांवर प्रामुख्याने कारवाई केली जाते.
त्यात झेब्रा क्रॉसिंगच्या केसेस अत्यंत कमी आहेत. प्रामुख्याने विना हेल्मेटच्या केसेस केल्या जातात.
बहुतांश वाहनचालक या नोटीसांकडे दुर्लक्ष करतात. शेवटी वाहतूक शाखेने विधी व सेवा प्राधिकरणाकडून अशा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कोर्टात खटला दाखल करुन लोकअदालतीमध्ये हे खटले पाठविले.
त्यात तडजोड करण्याची संधी दिली. अशातून लोकांनी ५०० रुपयांत तडजोड करुन २५० रुपये भरुन दंड भरला आहे.

गेल्या वर्षभरात एकूण १० लाख ३३ हजार ३२५ केसेस वाहतूक शाखेने केल्या. त्यात तब्बल ७८ कोटी २६ लाख ९१ हजार ३५०
रुपयांचा दंड ठोठाविला आहे. त्यात सर्वाधिक सीसीटीव्हीद्वारे ४ लाख २८ हजार ६१५ केसेस केल्या असून त्यांच्याकडून
३६ कोटी ८३ लाख ९७ हजार ३०० रुपये दंड केला आहे. चौकाचौकातील पोलिसांनी ३ लाख ३८ हजार ३५३ केसेसे केल्या
असून त्यांच्यावर २६ कोटी २८ लाख ९१ हजार ५५० रुपयांचा दंड केला. तसेच नो पार्किंगमध्ये उभे केलेली वाहने
टोर्इंगमार्फत उचलून नेली जातात. अशा प्रकारे २ लाख ६६ हजार ३५७ वाहनांवर टोईगद्वारे कारवाई केली गेली.
त्यांच्याकडून १५ कोटी १४ लाख २ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Firing In Police Station | भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार, जमिनीच्या वादातून गोळीबार (Video)

बोपदेव घाटात विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Pune News | मराठा समाज मागासलेपण पडताळणी सर्वेक्षण ! पुणे महापालिकेच्या हद्दीत 14 लाख 30 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण