Hemant Dhome | हेमंत ढोमेची ‘ती’ पोस्ट चर्चेत; वाळवी चित्रपटाबाबत केले ‘हे’ मोठे वक्तव्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेनी (Hemant Dhome) मराठी चित्रपटसृष्टी मध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. हेमंत नेहमीच विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. नुकताच त्याचा ‘सनी’ हा चित्रपट देखील चांगलाच गाजला होता. आता दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या ‘वाळवी’ या चित्रपटाबाबत हेमंत ढोमेने (Hemant Dhome) एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची हि पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

हेमंतने या पोस्टमध्ये त्याला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल खुलासा केला आहे. हेमंतने वाळवी या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हटले की, “एक असतो मराठी सिनेमा आणि दुसरा असतो वाळवी. अतिशय सुंदर आणि सकस आहे. मराठीत असे प्रयोग होताना कमीच दिसतात. प्रेक्षकांना अशाच गोष्टींची आवड असते. उत्तम आणि दर्जेदार सिनेमा म्हणजे वाळवी. मी संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आहे. कारण असे सिनेमे जमून यायला लागते ती म्हणजे, एक दर्जेदार टीम. एका कोणाचे नाव घेऊन संपूर्ण टीमवर त्याच्या अन्याय होतो. वाळवीतल्या वाळवीने सुद्धा आपलं काम चोखपणे साकारले आहे. मी काही समीक्षक नाही एक मराठी सिनेमाचा प्रेक्षक म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय वाळवी बघाच…… वाळवी तुमचं मनोरंजन करणारच….. लवकरच हाउसफुलचे बोर्ड झळकतील आणि पुन्हा एकदा मराठी सिनेमाला अभिमानास्पद केल्याबद्दल माझ्या या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन…. चला मंडळी तिकीट बुक करा…”

सध्या सोशल मीडियावर हेमंतच्या (Hemant Dhome) या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
झी स्टुडिओ आणि मधुगंध कुलकर्णी यांनी वाळवी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे.
तर या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
वाळवी हा मराठीतील पहिलाच थ्रिलकॅाम चित्रपट आहे.

 

Web Title :- Hemant Dhome | marathi actor hemant dhome share instagram post talk about vaalvi marathi movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | भाजप शहरअध्यक्ष व पदाधिकार्‍यांना छत्रपती संभाजी महाराजांच्याच नावाचा विसर?

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन; दाऊदच्या नावे फोन करून केली खंडणीची मागणी

Shweta Sharma | अभिनेत्री श्वेता शर्माच्या ‘त्या’ डान्स व्हिडिओवर चाहते घायाळ