Hiccups Remedies | सतत उचकी लागत असेल तर ट्राय करा हे आयुर्वेदिक उपाय, ताबडतोब थांबते उचकी

नवी दिल्ली : Hiccups Remedies | उचकी लागणे ही तशी गंभीर बाब नाही, पण जेव्हा उचक्या वारंवार येतात तेव्हा ते त्रासाचे कारण बनते. सतत येणारी उचकी थांबवण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. उचकी (Hiccups Remedies) थांबत नसेल, तर काही घरगुती उपाय किंवा काही आयुर्वेदिक उपचार करू शकता. हे उपाय जाणून घेऊया…

या गोष्टींनी थांबवू शकता उचकी

१. लिंबू Lemon –
हेल्थलाइनच्या एका बातमीनुसार, उचकी थांबवण्यासाठी लिंबू आणि मीठ वापरू शकता. यासाठी लिंबाचा रस आणि मीठ काही वेळ तोंडात ठेवा. यामुळे उचकी लवकर थांबेल. उचकी थांबल्यानंतर तोंड स्वच्छ करा. कारण जास्त वेळ लिंबू रस तोंडात ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

२. चिंच Tamarind –
चिंचेने सतत येणारी उचकी थांबू शकते. यासाठी सर्वप्रथम चिंच तोंडात ठेवा. यानंतर ती चोखत रहा. शक्य असल्यास चिंचे पाणी प्या. यामुळे लवकरच आराम मिळेल.

३. आले Ginger –
आल्याच्या सेवनाने सतत येणारी उचकी थांबवता येते. यासाठी आल्याचे काही तुकडे करा आणि तोंडात ठेवून चोखत राहा. यामुळे त्वरित आराम मिळेल. (Hiccups Remedies)

४. ब्लॅकबेरी Blackberry –
ब्लॅकबेरी एक सायट्रस फ्रूट आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक असते.
उचकी येत असेल तर ब्लॅकबेरी खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस पिऊ शकता. यामुळे उचकी पासून लगेच आराम मिळेल.

५. जायफळ Nutmeg –
जायफळ हा मसाला आहे. पण उचकी थांबवण्यासाठी याचा वापर करू शकता. जायफळचा तुकडा तोंडात ठेवून चोखा किंवा त्याचे पाणी प्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police News | पोलीस प्रोत्साहन भत्त्याच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी

ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी करप्शनकडून FIR