ACB Trap News | दोन लाखांची लाच मागणाऱ्या तलाठ्यावर अँन्टी करप्शनकडून FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) करुन तडजोडी अंती दीड लाख रुपये लाच मागणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. आकाश नारायण काशीकेदार (वय- 28) असे गुन्हा दाखल केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. एसीबीच्या (ACB Trap News) पथकाने ही कारवाई गुरुवारी (दि.31) केली.

याबाबत श्रीगोंदा तालुक्यातील जकाते वस्ती येथील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राकडून तोंडी भाडेतत्त्वावर पोकलेन मशिन कामा करीता घेतला होता. हा पोकलेन 11 जुलै रोजी रात्री एक वाजता पेडगाव येथील तक्रारदार यांच्या परिचयाच्या व्यक्तीच्या शेतात लावला होता. त्यावेळी पेडगावचे तलाठी काशीकेदार व सर्कल डहाळे हे पोकलेन लावलेल्या ठिकाणी आले. तुम्ही हा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे काशीकेदार व डहाळे यांनी तक्रारदार यांना सांगितले. तसेच तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई (Punitive Action) न करण्यासाठी तीन लाख रुपये लाचेची मागणी केली.

तलाठी आकाश काशीकेदार यांनी तक्रारदार यांना 11 जुलै रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे (Ahmednagar ACB Trap News) तक्रार केली. त्यानुसार पथकाने 11 जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी केली. लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी आकाश काशीकेदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड लाख रुपये लाचेची मागणी करून ती लाच रक्कम टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली. याबाबत एसीबीच्या पथकाने गुरुवारी तलाठी आकाश काशीकेदार याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात (Shrigonda Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी (Addl SP Madhav Reddy)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रवीण लोखंडे (DySP Praveen Lokhande),
पोलीस निरीक्षक राजू आल्हाट (PI Raju Alhat) पोलीस अंमलदार शिंदे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड,
हारून शेख, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aaditya Thackeray | उदय सामंतांच्या ‘त्या’ आरोपांवर आदित्य ठाकरेंचा पलटवार; म्हणाले “दसरा मेळाव्यासाठी 10 कोटी…”

Mumbai Pune Expressway | मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक; मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार