धक्कादायक ! कपड्याच्या दुकानात महिलांच्या ‘चेंजिंग’ रूममध्ये छुपा कॅमेरा, मालकासह दोघे ‘गोत्यात’, सर्वत्र ‘खळबळ’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अनेकदा मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये किंवा कपड्याच्या दुकानांमध्ये छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने महिलांचे चित्रीकरण केल्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. यानंतर पुन्हा एकदा नागपूरात अशाच प्रकारची घटना उजेडात आली आहे. नागपूरमधील सीताबर्डी भागात एका दुकानात कपडे बदलण्याच्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा लावून छुप्या पद्दतीने महिला आणि मुलींचे चित्रीकरण करण्यात येत असल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी या दुकानाचा मालक आणि तेथे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. या भागातील फ्रेंड्स गारमेंट्स या दुकानात एक १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी आपल्या मैत्रिणींसह कपडे खरेदी करण्यासाठी या दुकानात गेली होती. त्यावेळी कपडे बदलत असताना त्यांना हा छुपा कॅमेरा नजरेस पडला. त्यानंतर तिने तो मोबाईल तपासला असता तिला तीच कपडे बदलतानाचा व्हिडीओ दिसला. त्यानंतर तिने थेट पोलिसांत धाव घेत या प्रकरणाची तक्रार नोंदवली. या दुकानात काम करणारा निखिल उर्फ पिंटू दीपक चौथमल याने हा कॅमेरा याठिकाणी लावला होता.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी निखिल उर्फ पिंटू दीपक चौथमल आणि दुकानदार किसान अग्रवाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असून आरोपी नोकराला पोलीस कोठडी सुनावली असून मालकाला जामिनावर सोडण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like