‘हरामी’ नाला ! जिथं पाक कमांडो चिखलात लपून करतात घुसखोरीचा प्रयत्न, नौदलाचा ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाने गुजरातच्या बंदरांवर सुरक्षा संबंधित अलर्ट लागू केला आहे. तसेच तटरक्षक दलांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहे. नौदलला शंका आहे की, कच्छ रणमध्ये सरक्रीकच्या हरामी नाल्यामधून पाकिस्तानी कमांडो आत येऊ शकतात. नौदल प्रमुखांनी आपल्या अलर्टमध्ये सांगितले की, पाकिस्तान कमांडो कच्छमध्ये घुसखोरी करु शकतात. यामुळे तटरक्षक दलाला अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आधी देखील नौदलच्या सर्व युद्ध नौकांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले होते.

पाच दिवसांपूर्वी सीमा सुरक्षा दलाने गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भारत पाक सीमेजवळ हरामी नाला सरक्रीक क्षेत्रामध्ये पाकिस्तानच्या मासेमारी करणाऱ्या पकडणाऱ्या दोन रिकाम्या नौका ताब्यात घेतल्या होत्या. यानंतर बीएफएसकडून शोध मोहिम देखील राबवण्यात आली होती.

भारत पाक सीमेजवळच कच्छच्या सरक्रीकमध्ये हरामी नाला आहे. येथे लोकांना पूर्णता प्रतिबंध आहे. या क्षेत्रात 8 किमी क्षेत्रात धोकादायक दलदल आहे. ही दलदल जवळपास 500 चौरस फूट किमी पसरले आहे. मागील काही वर्षापासून पाकिस्तानी मच्छीमार ही जलसीमा उल्लंघन करण्याच्या घटना घडल्या आहेत. याच सीमा क्षेत्रात एक कृत्रिम भूयार पाहायला मिळाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like