High Court | खासगी जागेत दारू पिणे गुन्हा नाही – उच्च न्यायालयाचा निर्णय

तिरूवनंतपुरम : पोलीसनामा ऑनलाइन – High Court | आरोपीची ओळख पटवण्यासाठी बोलावलेल्या व्यक्तीने आरोपीला ओळखले नाही. त्याच्या तोंडाला दारूचा (alcohol) वास येत होता. तो दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात (सार्वजनिक ठिकाणी) आला, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ११८ (अ) केरळ पाेलीस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला होता. त्याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने (High Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. लोकांना त्रास होणार नाही अशा खासगी जागेत दारू पिणे, हा गुन्हा ठरत नाही किंवा एखाद्याच्या तोंडाला दारूचा वास आला म्हणजे तो दारुच्या नशेत होता, असे म्हणता येणार नाही असे न्यायालयाने म्हंटले आहे. (Drinking alcohol in private place not crime kerala high court)

केरळच्या बाटीअडका पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०१३ मध्ये सलीमकुमार बी. एस. याला एका गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीची ओळख पटवण्याची बोलावले होते. वेळ सायंकाळी ७ ची होती. मात्र, सलीमकुमार बी. एस. आरोपीला ओळखू शकला नाही. त्याच्या तोंडाला दारुचा वास येत होता. म्हणजेच तो दारू प्यायलेला (High Court) होता व दारुच्या नशेत पोलीस ठाण्यात (सार्वजनिक ठिकाणी) आला, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

दरम्यान, सलीमकुमार यांनी या गुन्ह्यात पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्र रद्द करावे म्हणून केरळ उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली होती.
त्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. सलीमकुमार यांची पोलिसांनी अल्कोमीटरने तपासणी केली; पण त्यांची वैद्यकीय तपासणी किंवा रक्ताची तपासणी केली नव्हती.
त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता म्हणजे तो दारूच्या नशेत होता असे म्हणता येणार नाही.
कारण तो बोलावल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर झाला. म्हणजे त्याचे स्वतःवर नियंत्रण होते.
तो नशेत नव्हता. त्याने खासगी जागेत बसून दारू प्यायली असेल, त्याच्यामुळे कोणाला त्रास, पीडा झाली नसेल तर तो गुन्हा होत नाही, असे म्हणत केरळ उच्च न्यायालयाने (kerala high court) दोषारोप पत्र रद्द केले.

हे देखील वाचा

High Court | परवानगी शिवाय दुसरा विवाह करणारा शिक्षेस पात्र, जाणून घ्या हायकोर्टानं नेमकं काय म्हंटलंय

Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : High Court | drinking alcohol private not crime says kerala high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update