Mumbai Police | कौतुकास्पद ! नाल्यातून वाहत जात होतं ‘नवजात’ बाळ, ‘म्याव-म्याव’ करून मांजरांनी केलं अलर्ट, मुंबई पोलिसांनी अर्भकाला वाचवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police | मुंबईमध्ये एका नवजात (Newborn Baby) बाळाला वाचवण्याची अनोखी घटना समोर आली आहे. येथील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यातून वाहून चालले होते. त्यास प्रथम मांजरांनी (Cats) पाहिले आणि त्यांनी आपल्या ‘म्याव-म्याव’ आवाजाने आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केले. यानंतर लोकांनी पोलिसांना माहिती दिली. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) घटनास्थळी जाऊन नवजात बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि हॉस्टिलमध्ये दाखल करून त्याचा जीव वाचवला.

 

 

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या घटनेबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, नवजात बाळ कपड्यात गुंडाळले होते. त्यास पाहून मांजरींनी ओरडण्यास सुरूवात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष या नवजात बाळाकडे वेधून घेतले. लोकांनी नवजात बाळ पाहून ताबडतोब पोलिसांना कळवले. पोलिसांचे निर्भया स्क्वाड ताबडतोब घटनास्थळी आले.

 

पोलीस पथकाने बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि त्यास राजावाडी हॉस्पिटलमध्ये (Rajawadi Hospital) नेण्यात आले.
तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नवजात बाळ धोक्याच्या बाहेर आहे आणि ठीक आहे.
पोलिसांनी ट्विटमध्ये नवजात बाळाचा फोटोही शेयर केला आहे.

 

Web Title :-  Mumbai Police | mumbai police saved newborn from drain after cats alert residents

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोने पोहचले 50 हजार रुपयांच्या जवळ, जाणून घ्या चांदीत आज किती आली तेजी?

Pune Crime | पुण्यात सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा यांच्याकडून कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Pune Crime | मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यु; पुण्याच्या बोपदेव घाटाजवळील घटना