नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्याची तयारी सुरू, PM मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली समिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देश यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस( Netaji Subhash Chandra Bose) यांची 125 वी जयंती साजरी करणार आहे. सरकारने यासाठी तयारी सुरू केली आहे. यावर सरकारने एक उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी( Prime Minister Narendra Modi) असतील. याबाबत सांस्कृतिक मंत्रालयाने आज माहिती दिली. सांस्कृतिक मंत्रालयाच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त तयार करण्यात आली आहे. उच्च स्तरीय समिती 23 जानेवारी 2021 पासून सुरू होणाऱ्या एका वर्षाच्या स्मारक सोहळ्याच्या कामकाजाविषयी निर्णय घेईल.

कोलकाता येथे राहतील पीएम मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती सोहळ्यानिमित्त बंगालमध्ये राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती उत्सवाची सुरुवात 23 जानेवारी रोजी कोलकाताच्या ऐतिहासिक ‘व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल’ मधून करतील. कोरोना साथीच्या काळात पंतप्रधान मोदींचा हा पहिला कोलकाता दौरा आहे.

पंतप्रधान मोदींनी गेल्या काही दिवसांपूर्वी नेताजींची भाची चित्रा घोष यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली होती आणि त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा केली होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की नेताजी सुभाष बोस यांचे धाडस सर्वश्रुत आहे. आम्ही या प्रतिभावान विद्वान, सैनिक आणि महान जननेत्याची 125 वी जयंती लवकरच साजरा करणार आहोत.