सारसबागेजवळील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सारसबागेजवळील मसाज सेंटरवर दत्तवाडी पोलिसांनी छापा घालून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. तीन महिलांची सुटका करुन दोन एजंटला अटक करण्यात आली. ही कारवाई सारसबाग येथील लेमन अॅक्वा स्पा अॅन्ड सलुन मसाज सेंटर येथे शुक्रवारी (दि.२०) दुपारी चारच्या सुमारास करण्यात आली.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c4ec76f6-8cc4-11e8-8f37-c3c463f3f7a0′]

मोना बलजिदर सिंग आणि सुनिल लक्ष्मण राठोड (रा. सायन कोळीवाडा चाळ, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत २७, २३ आणि २५ वर्षीय तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डफळ यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारसबाग परिसरातील लेमन अॅक्वा स्पा अॅन्ड सलुन मसाज सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दत्तवाडी पोलिसांनी छापा टाकून तीन तरुणींची सुटका करुन दोन एजंटला अटक करण्यात आली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.