सोन्याच्या दरात तेजी; चांदीचे दरही वधारले, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाच्या सराफा बाजारात सोन्याचांदीचा भाव वारंवार चढउतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसात सोन्याचा भाव घसरला होता. आता मात्र त्याचा भाव वाढताना दिसत आहे. याचबरोबर चांदीचे दरही वाढले आहे. MCX सोन्याच्या दरात आज शुक्रवारी ०.२३ टक्यांनी वाढ झालीय. सोन्यातील जूनमधील वायद्याचे दर हे प्रति १० ग्रॅम मध्ये ४७,८८४ पर्यंत गेले. सोन्याचा आजचा नवा भाव ४७,८८४ रुपये आहे. तर चांदीची किंमत ०.१६ टक्क्यांनी वाढून ती ६९,३२९ रुपये इथपर्यंत गेली आहे.

काल गुरुवारी दिल्लीत सोन्याची किंमत १६८ रुपयांनी खाली उतरून ४७,४५० इतकी झाली. तसेच चांदीची किंमत ६९,११७ रुपये झालीय. ही आकडेवारी HDFC सिक्यूरिटीजनुसार दिली गेली आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं येत्या काही दिवसात दरात तेजी पाहायला मिळू शकणार आहे. दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारनं एक अ‍ॅप बनवलं आहे. BIS Care app च्या माध्यमातून ग्राहक सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करू शकतात. तसेच यामधून माध्यमातून व्यक्ती तक्रार देखील करू शकणार आहे.

सध्याचे दर काय आहेत जाणून घ्या,

दिल्ली –
२२ कॅरेट – ४६,६५० रुपये.

चेन्नई –
२२ कॅरेट – ४५,३७० रुपये

मुंबई –
२२ कॅरेट – ४५,२५० रुपये