Gold Price Today : सोन्याला आलाय ‘भाव’ तर चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या दर…

नवी दिल्ली : वृत्त संस्था – गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहिला मिळत आहे. पण आता सोन्याच्या दरात वाढ झाली असून, पण चांदीच्या दरात घट झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा जूनचा वायदा 116 रुपयांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी वाढून 47,469 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.

सोन्या-चांदीच्या दरात चढउतार दिसत असताना आता चांदी 0.46 घसरुन 68,367 रुपये प्रतिकिलोवर आली आहे. तर सोन्याचा दर उच्चांकापेक्षा 9085 प्रतिदहा ग्रॅम स्वस्तच आहे. सोन्याच्या किमती लवकरच पुन्हा एकदा 50 हजारांच्या स्तरापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आर्थिक अनिश्चिततेमुळे बाँड यिल्डमध्ये घसरण, डॉलरच्या किमतीत घट आणि सोन्याच्या जागतिक मागणीत तेजी पाहायला मिळू शकते, असाही अंदाज आहे.

दरम्यान, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे प्रतिदहा ग्रॅम भाव 50,430 रुपये झाला आहे. तर मुंबईत हा दर 46,020 रुपये, चेन्नईमध्ये 48,580 रुपये तर कोलकातामध्ये 49,020 प्रतिदहा ग्रॅमवर गेला आहे.

ऑगस्टमध्ये उच्चांक

मागील वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दराने उच्चांक गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. त्यानंतर आता सोने 11,500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आता सोन्याच्या दरात वाढ होत आहे.