Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदीत घसरण, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतामुळे आज भारतात सोन्याच्या Gold दरात तेजी पहायला मिळाली. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा भाव 48 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 70 हजार 521 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 48 हजार 413 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.

सोन्याचा नवा भाव
दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवार) सोन्याच्या Gold दरात 195 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ झाली. त्यामुळे सोन्याचे दर 48 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेचे सोने 48 हजार 608 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. यापूर्वीच्या सत्रात सोन्याचा दर 48 हजार 413 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

चांदीचा नवा दर
चांदीच्या दरामध्ये आज थोडी घसरण झाल्याचे पाहायला मिळाली. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव 15 रुपयांनी कमी झाला असून आता नवा दर 70 हजार 521 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. यापूर्वीच्या सत्रात चांदीचा भाव 70 हजार 536 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’