‘विश्‍वविक्रम’ करणार्‍या हिमा दासचा ‘इतिहास’ कॅमेर्‍यात कैद पण…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची धावपट्टू हिमा दास हिने विश्वविक्रम करत १५ दिवसांत ५ सुवर्णपदे पटकावली. मात्र भारतीय माध्यमांनी कोणत्याही प्रकारे तिचा गौरव केला नाही किंवा किमान जे वार्तांकन करायला हवे होते ते देखील तिला मिळाले नाही. त्याचबरोबर या स्पर्धेत धावत असताना कॅमेरामन देखील हिमा दासकडे विशेष लक्ष देत नसल्याचे दिसून आले. ज्याप्रमाणे भारतीय मीडियाने हिमाच्या कामगिरीला फुटेज दिले नाही त्याचप्रमाने मैदानातील कॅमेरामनने देखिल तिच्या विजयी क्षणांची देखील नोंद घेतली नाही. झेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टोनाड मेटुजी ग्रां.प्री. स्पर्धेत महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विजय मिळवल्यानंतर मैदानातील कॅमेऱ्यांनी तिच्या विजयाची हवी तशी नोंद न घेतल्याने क्रीडा रसिक मोठ्या प्रमाणात नाराज झाले.

हिमा दासच्या विजयी व्हिडिओची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून या व्हिडिओत ज्याप्रकारे कॅमेरामन तिच्या विजयी क्षणाची नोंद घेत नाही याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून यावर अनेकांनी टीका करताना आपली वैयक्तिक मते देखील व्यक्त केली आहेत. या व्हिडिओत हिमा दास हि धावताना दिसून येत आहे. रेसच्या सुरुवातीला हिमा दास इतर धावकांसह धावताना दिसून येत आहे. रेस सुरु झाल्यानंतर ज्या पद्धतीने कमेंटेटर हिमा दासच्या धावण्याच्या पद्धतीचे कौतुक करत होता आणि हिमा दास ज्या क्षणी विजयी रेषा ओलांडणार होती त्यावेळी कॅमेरामन काय करत होता ? असा संताप लोक व्यक्त करत आहे.

ज्यावेळी हिमा दास इतर स्पर्धकांना मागे टाकत विजयाच्या जवळ जात होती त्यावेळी कॅमेरा तिच्यावर असायला हवा होता असा प्रश्न सर्वजण उपस्थित करत आहेत. त्यामुळे भारतीय चाहते हिमाच्या त्या क्षणांचा आनंद घेऊ शकले नाही. ज्यावेळी तिने तिच्यातील सर्व शक्ती पणाला लावून विजयाच्या दिशेने वाटचाल केली नेमका तोच क्षण भारतीय चाहत्यांना पाहायला नाही मिळाला. अनेक वेळ कॅमेरा अमेरिकेच्या खेळाडूंवरच होता, मात्र शेवटच्या क्षणाला एक मोठी सावली या सर्व खेळाडूंना मागे सारत विजयी रेषेजवळ पोहोचली.

दरम्यान, कॅमेरा हा हिमा दासच्या पायांवर हवा होता. त्याचबरोबर धावताना तिच्या गळ्याच्या पेशी कशा प्रकारे आखडला होत्या यावर असायला हवा होता. त्याचबरोबर विजयानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपण्यासाठी हा कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर असायला हवा होता अशी चर्चा रंगत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या संपादकांनी देखील यावर एक भलामोठा ब्लॉग लिहून आपली नाराज व्यक्त केली आहे. त्यामुळे कॅमेऱ्याने हिमाचा इतिहास रेकॉर्ड केला मात्र तिच्या विजयाच्या क्षणांची नोंद केली नाही असे सध्या बोलले जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त