हिमांशु रॉय यांची आत्महत्या कॅन्सरमुळे नाहीच !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

आयपीएस अधिकारी हिमांशु रॉय यांनीकर्करोगाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती शुक्रवारी समोर आली. आज मात्र रॉय त्यांच्यावर इलाज करणाऱ्या डॉक्टर राज नगरकर यांनी एक धक्कादायक माहिती दिले. ते म्हणाले,” हिमांशू यांची ३० एप्रिलला पीटीआय स्कॅनच्या अहवालानुसार त्यांच्या शरीरात कर्करोगाचा कुठलाच अंश सापडला नसल्याचे सांगितले. ते आजारातून बरे झाले होते. त्यामुळे असे म्हणणे चुकीचे ठरेल की, त्यांना कर्करोगाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.” तसेच नगरकर म्हणाले की,२०१६ मध्ये त्यांना हाडाचा कर्करोग झाला होता. मात्र त्यावर कोणत्या औषधाचा परिणाम होईल हे जाणण्याकरिता आम्ही त्यांच्या काही चाचण्या केल्या होत्या.” तसेच ते म्हणाले की,”३० एप्रिलच्या अहवालानुसार त्यांच्या शरीरात कर्करोगाचा एकही अंश शिल्लक नव्हता. ते खूष होते. त्यांनी डॉक्टरना विचारले होते की मी पुन्हा रुजू कधी होऊ शकतो? त्या प्रश्नांवर डॉक्टरनी सकारात्मक उत्तर दिले होते. तीन आठवड्यांपूर्वी ते हिमांशू यांच्याशी बोलले होते. तेव्हा रॉय म्हणाले की, कर्करोगाणे त्रस्त असलेल्यांशी मला खुलेपणाने बोलायचे आहे.”

संबंधित घडामोडी:
कसाबच्या फाशीत रॉय यांचा मोलाचा वाटा
नैराश्येतूनच हिमांशु रॉय यांची आत्महत्या
हिमांशू रॉय : एक दबंग पोलीस अधिकारी
अप्पर पोलिस महासंचालक हिमांशु रॉय यांची आत्महत्या