Photos : अभिनेत्री हिना खानच्या लेटेस्ट स्टायलिश लुकवर चाहते फिदा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हिना खान (Hina Khan) नेहमीच चर्चेत येत असते. हिना खान सोशलवर कायमच ॲक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना आपल्या हॉटनेसमुळं चर्चेत आली होती. हिनाचे हॉट लुकवाले फोटो सोशलवर व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा ती आपल्या लेटेस्ट लुकमुळे चर्चेत आली आहे.

हिनानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात हिना खूपच गॉर्जियस आणि ब्युटीफुल दिसत आहे. चाहत्यांना तिचा हा लुक खूप आवडला आहे. तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते पुन्हा अवाक् झाले आहेत. आपल्या काही फोटोंमध्ये तिनं बोल्ड आणि हॉटनेसचा तडका दिल्याचंही दिसत आहे.

चाहत्यांनी हिनाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं फ्लॉवर प्रिंटवाला ड्रेस घातला आहे. यात ती खूपच मोहक दिसत आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती झी 5 वरील अनलॉक या सीरिजमध्ये काम करताना दिसली. 27 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज झाली होती. तिनं डॅमेज 2 या सीरीजमध्ये काम केलं आहे. हिनानं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती. हिना बिग बॉस 14 मध्येही सीनियर कंटेस्टेंट म्हणून सहभागी झाली होती. ये रिश्ता क्या कहलता है या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.