हिना खानंच ‘ऋषी कपूर-इरफान खान’ यांना ‘म्युझिकल’ ट्रिब्युट ! शेअर केला ‘इमोशनल’ व्हिडीओ

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही इंडस्ट्रीत धमाल करणारी अभिनेत्री हिना खान नेहमीच चर्चेत येत असते. सध्या देशात लॉकडाऊन असला तरी हिना खान सोशलवर अॅक्टीव दिसत असते. अलीकडेच हिना आपल्या एका व्हिडीओमुळं चर्चेत आली आहे. व्हिडीओत हिना खान गाणं गाताना दिसत आहे. तिनं दिवंगत इरफान खान आणि ऋषी कपूर यांना म्युझिकल ट्रिब्युट दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

हिनानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आपल्या भावना मांडत आहे आणि एक गाणंही गात आहे. यावेळी हिना इमोशनल झाल्याचंही दिसत आहे. तिनं दिवंगत ऋषी कपूर आणि इरफान खान यांना म्युझिकल ट्रिब्युट दिलं आहे.

वास्तविक पाहता कलर्य चॅनलवर या रविवारी म्हणजेच 10 मे 2020 रोजी एका शो येणार आहे ज्याचं नाव आहे दर्द ए दिल. यात इरफान खान आणि ऋषी कपूर यांना म्युझिकल ट्रिब्युट दिलं जाणार आहे. कलर्स सोबत यात हिना खानचाही सहभाग असणार आहे. तिनं यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात ती गाणं गाताना आणि तिच्या भावना मांडताना दिसत आहे. या व्हिडीओवर अभिनेत्री मौनी रॉय हिनं कमेंट केली आहे आणि हिनाचं कौतुक केलं आहे.

हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर डॅमेज 2 या सीरीजमध्ये तिनं काम केलं आहे. याशिवाय तिनं विक्रम भट्टच्या हॅक्ड या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला आहे. याआधी हिना कसौटी जिंदगी की पार्ट 2 मध्ये दिसली होती. यात तिनं साकारलेली कोमोलिका साऱ्यांनाच आवडली होती.