अभिनेत्री हिना खानचं ‘प्री-रक्षाबंधन’ सेलिब्रेशन, ‘बॉयफ्रेन्ड’च्या बहिणींकडून बांधून घेतली राखी

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – रक्षाबंधन दोन दिवसांवर आहे. त्यामुळे सर्वत्र राखी आणि रक्षांबंधनाचा, बहिण-भावांच्या नात्यांचे वातावरण आहे. तसंच यावर्षी रक्षाबंधन आणि १५ ऑगस्ट एकाच दिवशी आहे. रक्षाबंधनाला दोन दिवस असूनही मात्र अभिनेत्री हिना खान हिने रक्षाबंधन साजरीही केली आहे. हिनाने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर प्री-राखी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात हिना आपला प्रियकर रॉकी जैसवाल सोबत असून त्याच्या बहिणींकडून राखी बंधून घेत आहेत.

रॉकी आणि त्याच्या बहिणींचे फोटो हिनाने शेअर केले आहेत. तसंच त्याला प्री-राखी सेलीब्रेशन बहिणींसोबत आणि कुटुंबासोबत, असं कॅप्शन दिले आहे. तसंच त्यात आशिर्वाद दिल्या बद्दल घरातील मोठ्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. तसंच आपल्या भावासोबत १५ तारखेला फोटो पोस्ट करेन असंही तिने यात म्हटलं आहे.

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे रॉकीच्या बहिणींसोबत असलेले बाँडींग दिसत आहे. तसंच राखी बांधताना रॉकी आणि हिना जोड्याने बसलेले दिसत आहेत. हिना यात वेस्टर्न लुकमध्ये दिसत असून डोक्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतल्याचे दिसत आहे. तिचा हा लुक अनेकांनी पंसतही केला आहे.

दरम्यान, हिना खान आणि रॉकी यांची जोडी प्रेक्षकांनाही फार आवडत आहे. दोघे अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. बिग बॉसमध्ये या दोघांच्या रिलेशनमुळे अनेकदा हिनाला ट्रोल करण्यात आले होते. आता ट्रोल करणारेच त्यांच्या नात्याचे कौतुक करताना दिसत आहे.


आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like