गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या ‘त्या’ महिलेला बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत पूजा पांड्ये आणि हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर पूजाला अखेर बेड्या घालण्यात आल्या आहेत. दिल्लीतील अलीगढ पोलिसांनी कारवाई करीत दिल्ली – नोएडा सीमेवरील नोएडा सेक्टर १४  A  मध्ये पूजा आणि तिचा पती अशोक पांड्ये यांनाअटक केली. पूजा ही हिंदू महासभेची राष्ट्रीय सचिव आहे.
उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये महात्मा गांधींच्या ७१ व्या पुण्यतिथीला (३० जानेवारी २०१९) पूजा पाण्डेय हिने महात्मा गांधींचा अवमान केला होता. महात्मा गांधींच्या प्रतिमेची प्रतिकात्मक हत्या करण्याचं कृत्य या विकृतांनी केल्यानंतर अवघ्या देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकांकडून पूजा पाण्डेयच्या कृतीचा निषेध केला जात होता. सोशल मीडियावर देखील तिच्या या कृत्यामुळे पूजा भलतीच ट्रोल  झाली आहे.
ही तर विकृतीच 
नथुराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली होती, तोच प्रसंग उभा करण्यासाठी अलीगढमध्ये हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी बापूजींच्या प्रतिमेलाच गोळ्या घातल्या. या विकृतीचा व्हिडिओ समोर आला आहे.

नथुराम गोडसेने गांधीजींना जितक्या गोळ्या घातल्या, तितक्याच म्हणजे तीन गोळ्या पूजा पाण्डेयने घातल्या. याशिवाय हत्या खरी वाटावी म्हणून विकृतांनी प्रतिमेखाली रक्तही ओतलं होतं. त्यानंतर महात्मा गांधींची प्रतिमा या विकृतांनी पेटवून दिली. ज्या नथुरामने महात्मा गांधींची हत्या केली, त्याचा जयजयकारही यावेळी करण्यात आला.

आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही. आम्ही आमच्या आधिकाराचा वापर करु.