Hingoli Accident News | ड्युटीचा शेवटचा दिवस… पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli Accident News | हिंगोली येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू (Policeman Death) झाला आहे. आपले कर्तव्य बजावत असतानाच त्यांचा (Hingoli Accident News) मृत्यू झाला आहे. हिंगोली-कळमनुरी मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारची दुचाकीला धडक बसली. यात बंदोबस्तावर जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

सुरेश बळीराम बांगर Suresh Baliram Bangar (वय-57) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. बांगर हे पोलीस जमादार पदावर कार्यरत होते. कळमनुरी पोलीस ठाण्यांतर्गत (Kalmanuri Police Station) तालुका विशेष शाखेत (Taluka Special Branch) ते कार्यरत होते. बांगर हे हिंगोली येथील बैठक आटोपून कळमनुरी येथे मिरवणुक (Hingoli Accident News) बंदोबस्तावर निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मोटारसायकलला (एमएच 38 एस -4244) धडक बसली.

सुरेश बांगर हे मंगळवारी सकाळी हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीच्या निमित्ताने आले होते.
दुपारी बैठक आटोपून ते दुचाकी वाहनावरुन कळमनुरीकडे जात होते.
त्यांचे वाहन हिंगोली कळमनुरी मार्गावर सेलसुरा शिवारात आले असतांना भरधाव वेगात जाणाऱ्या कारने
त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यांना तातडीने हिंगोली सामान्य रुग्णालयात दाखल केले.
त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.

Web Title :-  Hingoli Accident News | a policeman died in a bike accident in hingoli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचे चंद्रकांतदादांचे ते विधान चुकीचे’, भाजपने स्पष्टच सांगितलं

Chandrakant Patil | ‘बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात श्रद्धा, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला’, ‘त्या’ विधानावरुन चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

Maharashtra Politics News | ‘बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नव्हती’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; शिंदे गटाला दिलं थेट आव्हान