Maharashtra Politics News | ‘बाळासाहेबांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी केली नव्हती’, संजय राऊतांचा भाजपवर घणाघात; शिंदे गटाला दिलं थेट आव्हान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी (Babri Masjid) पाडल्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी भाजप (BJP)-शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी यावरुन भाजपवर निशाणा साधताना दुसरीकडे शिंदे गटावर परखड (Maharashtra Politics News) शब्दांत टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या मांडीला मांडी लावून जे सरकारमध्ये बसले आहेत ते मिस्टर डॉ. मिंधे आणि त्यांच्या 40 लोकांनी हिंदुत्वासाठी (Hindutva) शिवसेना (Shivsena) सोडली ते तीर मारत आहेत. त्यांच्याकडून चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया अपेक्षित (Maharashtra Politics News) आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा इतका मोठा अपमान करण्याची हिंमत कुणी दाखवली नव्हती. तुम्ही गुलाम झाल्यामुळे, शिवसेना फोडल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करतायेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.

हिंमत असेल तर प्रतिक्रिया द्या

संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री (CM) गुलाम आहेत. हिंमत असेल तर यावर प्रतिक्रिया द्यावी. पण गुलामाला हिंमत नसते. बाबरी पाडली त्यानंतर भाजपने पलायन केलं हा इतिहास आहे. बाबरी तोडणारे आमचे, भाजपाचे किंवा अन्य कुणीही नव्हते. ते शिवसैनिक होते हे भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी (National Vice President Sunder Singh Bhandari) यांनी जाहीर सांगितले होते. त्यानंतर लगेच बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले की, होय तुम्ही जर पळून गेला असाल आणि बाबरी तोडणारे शिवसैनिक असतील तर मला त्या शिवसैनिकांचा अभिमान आहे, असं संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं.

हिंमत असेल तर राजीनामा द्या

Advt.

आम्ही पळपुटे नव्हतो आणि नाही. ज्या पळपुट्यांना घेऊन आज भाजपने सरकार बनवलं,
त्यांची हिंमत एवढी वाढली के ते आता बाळासाहेब ठाकरेंवर चिखलफेक करु लागले आहेत.
त्या चिखलात बसून डॉ. मिंधे आणि 40 लोक राज्यात सत्ता उपभोगत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या मुखातून भाजप बोललाय. त्यांना माहिती आहे की सत्तेचे मिंधे तोंड उघडणार नाहीत.
त्यावर मी तर म्हणेन निषेध म्हणून राजीनामे द्या.
आहे का हिंमत तुमच्यात? नसेल तर शिवसेना आणि हिंदुत्वाचं नाव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही.
तुम्ही जाहीर करा की आम्ही भाजपाच्या सत्तेत सामील झालेले गुलाम आणि मिंधे आहोत
, असे जाहीर आव्हान संजय राऊतांनी शिंदे गटाला दिले आहे.

Web Title :- Maharashtra Politics News | no one dared to insult balasaheb thackeray so much sanjay raut target cm eknath shinde and bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jyotiba Phule Jayanti – Chandrakant Patil | महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

CM Eknath Shinde Threat Call | ‘मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे’, मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ! पुण्यातून धमकीचा कॉल, मुंबईतील एकजण अटकेत

PM Kisan | १४व्या हप्त्याची मोठी अपडेट! या महिन्यात येऊ शकतात पैसे, तयार ठेवा हे डॉक्‍यूमेंट