हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन – Hingoli News | येलकी (Yelki) येथे एक धक्कादायक प्रकार घडला (Hingoli News) आहे. येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमधील (Sashastra Seema Bal) कार्यरत असलेल्या जवानाचा (soldier) छातीत गोळी लागून मृत्यू (Died) झाला आहे. त्यांच्या फोर्सच्या डॉक्टरला आणण्यासाठी नांदेडला जात असताना खड्ड्यांमध्ये गाडी आदळल्याने रायफल (Rifle) मधून गोळी झाडली गेली. ती छातीत लागली. पप्पाला भानूप्रसाद (वय 35, रा. आंध्र प्रदेश) असं मृत जवानाचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli News) येलकी येथील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्पमध्ये कार्यरत असलेले जवान कॉन्स्टेबल पप्पाला भानूप्रसाद
(Pappala Bhanuprasad) हे कर्तव्यावर होते.
पहाटे 3.30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ते डिपारमेंटच्या वाहनातून हैदराबाद वरून नांदेडला आलेल्या डॉक्टरला घेण्यासाठी ते नांदेड कडे रवाना झाले होते.
चालक आणि जवान जात असताना डोंगरकडा ते नांदेड या रस्त्यावर काही अंतरावर ही घटना घडली. रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठे खड्डे पडले आहेत.
या खड्ड्यात गाडी आदळल्याने ‘ इंसास रायफल ‘ मधून गोळी सुटली. ती थेट जवानाच्या छातीत घुसली. त्यातच जवानाचा मृत्यू (Died) झाला.
दरम्यान, यानंतर जवानाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तर, घटनास्थळी ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड (Thanedar Pandharinath Bodhanapod),
पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड (PSI Balaji Pund) पोहोचले आहेत.
तसेच, सशस्त्र सीमा बलाचे कमांडंर तिवारी (Commander Tiwari) यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
परंतू, संपर्क झाला नाही. नांदेड हिंगोली रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात घडला असल्याची चर्चा सुरू आहे.
Web Title : Hingoli News | armed border force soldier shot dead while going by raod in hingoli marathi news policenama
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो