हिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी : सोसायटीमधील मैदानात लहान मुले खेळत असताना एका ६४ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने सोसायटीतील एका अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांनी अनंतराव किसनराव शिंदे (वय ६४, रा. मेगा पोलीस, हिंजवडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका मुलीने हिंजवडी (Hinjewadi) पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मलायकाची ‘मॉर्निंग कॉकटेल’ रोग प्रतिकारशक्ती वाढवेल, जाणून घ्या उपाय आणि त्याचे फायदे

फिर्यादी ही ८ जून रोजी सायंकाळी सात वाजता मेगा पोलीस सोसायटीतील गार्डनमध्ये भावाबरोबर खेळायला गेली होती. तेथील लहान मुलांच्या असणार्‍या बाकड्यावर बसली होती. त्यावेळी आरोपी याने तिचा हात पकडून दाबला. ती तो सोडवून घेत असताना त्याने हात धरुन ठेवला व तुला काय फील होतेय का असे विचारले.

उन्हाळ्यात अंडी खावी की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

त्याच्या अशा वागण्याने फिर्यादीला खूप भिती वाटली. ती तेथून उठू लागली.
त्यावेळी आरोपीने फिर्यादीचा हात धरुन अचानक तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.
ही गोष्ट या मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हे देखील वाचा

येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

 

रोग प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल तर दररोज रात्री करा ‘हे’ उपाय

 

कोट्यवधी केंद्रीय कर्मचार्‍यांना झटका ! मोदी सरकार करणार ‘या’ भत्त्यांमध्ये 20% कपात, जाणून घ्या का घेतला निर्णय?

 

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Titel :  Hinjewadi | A 64 year old senior molested a minor girl in Bhar Maidan