येथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50 लाखांची ‘ही’ सुविधा सुद्धा Free

नवी दिल्ली : जर तुम्ही गुंतवणुकीची योजना बनवत असाल तर आज आम्ही तुम्हाला तीन असे जबरदस्त इन्व्हेस्टमेंट प्लॅन सांगणार आहोत, ज्यात तुम्ही कमी गुंतवणुक करून मोठे पैसे मिळवू शकता. तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) चे नाव आवश्य ऐकले असेल. ही एक (SIP) म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची सर्वात पॉप्युलर पद्धत आहे.

येथे आपल्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता. Systematic Investment Plan मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक प्रकारचे चांगले प्लॅन आहेत.

यामध्ये लाँग टर्ममध्ये गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळण्याची शक्यता जास्त असते.

मार्केटमध्ये असे अनेक प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्ही 100-500 रुपये लावून गुंतवणुकीची सुरूवात करू शकता.

जाणून घ्या काही असे प्लॅन ज्यांनी आकर्षक रिटर्न दिले आहेत…

25 टक्केपर्यंत मिळतो रिटर्न

मार्केटमध्ये असे अनेक प्लॅन आहेत, त्यांनी 5 वर्षातच 15 टक्केपासून 25 टक्केपर्यंत आकर्षक रिटर्न दिला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टच्या आधारावर सांगण्यात आले आहे की, पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड, कोटक स्मॉलकॅप फंडवर गुंतवणुकदारांनी आकर्षक रिटर्न मिळवला आहे.

हे आहेत जबरदस्त प्लान –

1. पीजीआयएम इंडिया मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंडने मागील 5 वर्षात 25 टक्केचा रिटर्न दिला आहे. म्हणजे 5 वर्षात जर तुम्ही 3 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची व्हॅल्यू वाढून 11 लाख रुपयांवर पोहचली आहे.

2. कोटक स्मॉलकॅप फंडने मागील 5 वर्षात 23 टक्केपेक्षा जास्तचा रिटर्न आपल्या गुंतवणुकदारांना दिला आहे. 5 वर्षात जर 3 लाख रूपये गुंतवले असतील तर त्याची व्हॅल्यू वाढून 10.54 लाख रुपये झाली आहे.

3. मिरे एसेट्स इमर्जिंग ब्लूचिपने मागील 5 वर्षात 23 टक्के रिटर्न दिला आहे. म्हणजे जर तुम्ही 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तिची व्हॅल्यू 10.47 लाख रुपये होईल.

50 लाखापर्यंतचा फ्री विमा

स्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्सचे अनेक फायदे सुद्धा आहेत. जर तुम्ही सीपद्वारे गुंतवणूक केली तर जास्त लाभ होऊ शकतो.
यामध्ये तुम्हाला 50 लाखापर्यंतच्या फ्री विम्यासह अन्य सुविधा सुद्धा मिळतात.
अनेक म्यूच्युअल फंड कंपन्या एसआयपी विमा कव्हर म्हणून अतिरिक्त बेनिफिट देतात.
सामान्यपणे हा लाभ तोपर्यंत मिळेल जेव्हा गुंतवणुकदाराने 36 महिन्याच्या एसआयपीचा पर्याय निवडला असेल.
यामध्ये जीवन विम्याची रक्कम पहिल्या वर्षानंतर वाढत राहते.

हे देखील वाचा

केरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून दुबईतून आणले होते ‘सोने’

कोरोनाकाळात ‘जलनेती’ ठरते अतिशय उपयुक्त, जाणून घ्या

13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार, इतरांसाठी असा आहे रविवार

कोरोना काळात किचनमधील ‘या’ 5 गोष्टी साफ करण्यास विसरू नका, जाणून घ्या

PUBG गेम्स बनवणारी कंपनी पुढील आठवड्यात आणतेय 11 वर्षातील सर्वात मोठा IPO ! जाणून घ्या याच्या खास गोष्टी

नखाभोवतीच्या त्वचेची या पध्दतीनं घ्या काळजी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

 

Web Titel :  SIP | these are 3 best sip plan invest you can earn 11 lakh rupees just in 5 year and get 50 lakh free check details