Hit and Run Law | ‘हिट अँड रन कायदा 2023’ च्या विरोधात देशभरातील वाहतूक संघटनांचे दिल्लीत आंदोलन

आंदोलक वाहतुकदारांवर लाठीचार्जचा राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशन कडून निषेध

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Hit and Run Law | ‘ हिट अँड रन 2023 या नवीन कायद्यानुसार अपघातप्रसंगी पळून जाणाऱ्या चालकाला दहा वर्षे शिक्षा व लाखो रुपये दंड आकारण्याच्या केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक, बस, टेम्पोसह सर्वच वाहनचालकांमध्ये तीव्र रोष आहे. या कायद्याविरोधात 3 जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. उद्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून त्यामध्ये देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात येईल. सध्या अनेक ठिकाणी आंदोलन सुरू असून वाहतुकदारांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन राष्ट्रीय ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनने दिला आहे. (Hit and Run Law)

फेडरेशन चे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे आवाहन केले. याप्रसंगी फेडरेशन चे आनंद तांबे, एकनाथ ढोले, सचिन तांबे, मोहमद शेख आदी उपस्थित होते. कांबळे यांनी सांगितले की, सरकारचा हिट अँड रन कायद्यातील नवीन बदलांमुळे 25 कोटी वाहनचालकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. हा कायदा रद्द करावा व इतर प्रलंबित मागण्या मान्य कराव्या यासाठी बुधवारी 3 जानेवारीपासून जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात देशभरातील 750 पेक्षा जास्त संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला पुणे शहर व जिल्ह्यातून शेकडो चालक सहभागी होणार आहेत. (Hit and Run Law)

राज्यात काही ठिकाणी आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आहे.
त्याचा आम्ही निषेध करतो. 3 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या आंदोलनात ज्या चालकांना दिल्लीला येणे शक्य होणार नाही त्यांनी राज्यातील आपल्या जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे.

अनेक ठिकाणी आंदोलकांनी काम बंद आंदोलन पुकारून सेवा स्थगित केली आहे.
हे आंदोलन करत असताना कोणत्याही शासकीय, सार्वजनिक अथवा खासगी मालमतेचे नुकसान होऊ देऊ नये,
असे आवाहन कांबळे यांनी यावेळी केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

महिलेचा पाठलाग करून विनयभंग, पतीला मारहाण; कोंढवा परिसरातील घटना

पुणे : फिरायला नेण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Bhandara Sunflag Steel Company Blast | सनफ्लॅग कंपनीतील भीषण स्फोटाने भंडारा हादरला; ८ कामगार जखमी, तिघांची प्रकृती गंभीर

चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीची आत्महत्या, मंगळवार पेठेतील घटना; पतीवर FIR