Hockey World Cup | हॉकी विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण करताना क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान, म्हणाले …..

पोलीसनामा ऑनलाईन : 13 जानेवारी ते 29 जानेवारी यादरम्यान ओडिशामध्ये हॉकी विश्वचषक (Hockey World Cup) स्पर्धा पार पडणार आहेत. त्याअगोदर दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते हॉकीच्या ट्रॉफीचे (Hockey World Cup) अनावरण करण्यात आले. त्यावेळी हॉकीपटू अशोक ध्यानचंद, माजी कर्णधार अजित पाल सिंग, ज्यांनी 1975 मध्ये भारताला पहिला हॉकी विश्वचषक जिंकून दिला होता ते आणि त्याशिवाय हॉकी इंडियाचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते.

2023 चा हॉकी विश्वचषक मायदेशात होणार असल्यामुळे भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून
नव्या पिढीसाठी प्रेरणास्पद कामगिरी नक्की करेल, असा विश्वास यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि हॉकीतील माजी दिग्गजांनी व्यक्त केला आहे. 13 ते 29 जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर आणि राऊरकेला या ठिकाणी विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले आणि त्यानंतर विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण केले. यावेळी अनेक शाळांचे युवा खेळाडूही उपस्थित होते.

“भारतीय संघ सज्ज असून अन्य 15 संघांचे आव्हान मोडीत काढण्याची आमच्या खेळाडूंची तयारी आहे.
माझ्या मते, मायदेशात आमचा संघ विश्वविजेता नक्की बनू शकतो.
भारतीय संघाची तयारी, खेळाडूंमधील नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून मला विश्वास आहे की भारत
नक्की विश्वविजेता होईल. तसेच आम्ही विश्वचषक आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करू.”
असे मत विश्वचषकाचे अनावरण केल्यानंतर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

Web Title :-  Hockey World Cup | hockey world cup this is the world cup for the coming generation sports minister anurag thakurs big statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajay-Atul | गाणी रिमिक्स करणाऱ्यांवर अजय – अतुलने व्यक्त केली नाराजी; म्हणाले…

Pune District Mining Crusher Industries Association | पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाच्या वतीने बेमुदत संप