499 वर्षानंतर होळीला ‘शनी-गुरू’चा अद्भूत योग, 12 महीने राशींवर असा परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम : होळीच्या सणात यावर्षी ग्रहांचा दुर्लभ योग होत आहे. न्यायाची देवता शनी आणि करीयर, धन आणि संपत्तीचा कारक गुरू आपआपल्या राशीमध्ये असतील. म्हणजे गुरू धनु राशीत आणि शनी मकर राशीत असतील. ग्रहांचा असा महायोग 499 वर्षानंतर होत आहे. यापूर्वी हा योग 1521 मध्ये झाला होता.

या महायोगचा परिणाम पुढील वर्षीच्या होळीपर्यंत सर्व राशींवर राहणार आहे. म्हणजे हा योग या होळीपासून पुढल्या वर्षीच्या होळीपर्यंत तुमच्या जीवनावर परिणाम करणार आहे. याचा कोणत्या राशीवर कोणता परिणाम होणार याबाबत प्रसिद्ध ज्योतिषांनी काय सांगितले आहे ते जाणून घेवूयात.

मेष :
करियर आणि धनाच्या बाबतीत स्थिती चांगली राहिल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. करियरमध्ये यश मिळेल. येणारा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली राहणार आहे. नोकरी बदलण्याचे सुद्धा योग आहेत. आरोग्याकडे थोडे लक्ष द्यावे लागेल.

विचारपूर्वक निर्णय घ्या. मोठ्यांचे म्हणणे ऐकूण घ्या. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी होवू शकतात. घरातील एखाद्या सदस्याची प्रकृती बिघडू शकते.

वृषभ :
करियरमध्ये तुम्हाला जबरदस्त यश मिळणार आहे. एखादे मोठे काम पूर्ण होईल. पैशाच्या बाबतीत स्थिरता राहिल. वारसा हक्काच्या संपत्तीतून लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंध खराब होतील. पती-पत्नीमध्ये दूरावा येऊ शकतो.

व्यापार्‍यांना लाभाचे संकेत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहिल. पती-पत्नीमध्ये संबंध मधुर राहतील. प्रेमसंबंधात सर्वकाही ठीक राहिल.

मिथुन :
करियर आणि व्यवसायात चढ-उताराची स्थिती राहिल. काही अडचणी वाढतील आणि तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर सध्या हा विचार बाजूला ठेवा. आता आहात तेथेच काम करा.

वारसा हक्काची संपत्ती विकल्याने हानी होऊ शकते. कुणाकडूनही कर्ज घेऊ नका, आणि कुणाला कर्ज देऊ नका. जर नव्या घरात जाण्याचा विचार असेल तर हा निर्णय पुढे ढकला.

कर्क :
व्यापारात नुकसान होण्याचे संकेत आहेत. नोकरी करणार्‍यांना कोणतीही समस्या नाही परंतु, चुकीच्या बोलण्यामुळे अधिकार्‍यांशी वाद होऊ शकतो. करियरमध्ये लोकांकडून मिळणारे सहकार्य कमी होईल.

प्रॉपर्टीत गुंतवणूक केलेल्या पैशावर संकट येऊ शकते. पती-पत्नीच्या संबंधात दुरावा येऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मसालेदार, तळलेले, भाजलेले पदार्थ खाण्यापासून दूर रहा.

सिंह :
करियर आणि व्यवसायात चढ-उतार राहिल. कुटुंबाला कमी वेळ देऊ शकाल. नोकरीनिमित्त कुठेतरी बाहेर जाण्याचा योग आहे. पैशाच्या बाबतीत शेयर मार्केटपासून दूर राहणेच तुमच्यासाठी चांगले आहे. सुरक्षित गुंतवणूकच करा.

प्रॉपर्टीच्या बाबतीत गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. वारसा हक्काच्या संपत्तीचे प्रकरण मार्गी लागेल. प्रेमसंबंध खुप चांगले राहतील. करियरच्या समस्या संपुष्टात येतील.

कन्या :
कन्या राशीवाल्यांना या महा योगायोगाचा खुप मोठा लाभ मिळणार आहे. एखाद्या कामात खुप यश मिळेल. एखाद्या नव्या योजनेवर पैसा लावणार असाल तर त्यातून खुप फायदा होऊ शकतो. धन वाढेल, शेयर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होईल.

पैशाचे सर्व मार्ग खुले होतील. व्यापारातही लाभ होईल. घरात सुखशांती राहिल. वडीलांशी संबंध सुधारतील. आरोग्य पहिल्यापेक्षा चांगले राहिल. खर्चसुद्धा कमी होतील.

तुला :
होळीपासून तुमचा चांगला काळ सुरू होईल. करियरमध्ये काहीतरी नवीन होईल. प्रमोशन आणि बढतीचा योग आहे. नव्या कामात लाभ होईल. पुढे जाण्यासाठी वेळ खुप चांगली आहे.

पैशाच्याबाबतील भाग्यशाली राहाल. परंतु, तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. घर, गाडी आणि बंगला खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत. पती-पत्नीचे संबंध चागले राहतील. बहिण-भावाच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक :
करियर आणि व्यवसायात यश मिळेल. तुमची साडेसाती संपली आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात काहीतरी नवीन करण्याची संधी मिळेल. नोकरी बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

वारसा हक्काची संपत्ती कुठेतरी अडकू शकते. पती-पत्नीच्या संबंधात कटुता येईल. तोंडावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. वडीलांच्या आरोग्यसंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.

धनु :
धनु राशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे. ज्यामुळे करियरमध्ये अडचणी येऊ शकतात. पैशाची कमतरता जाणवणार नाही, परंतु गुंतवणुकीवेळी सावध राहण्याची गरज आहे.

या होळीपासून पुढल्या होळीपर्यंत प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे लाभाचे ठरेल. यादरम्यान केलेली गुंतवणूक अनेकपटीने वाढेल. लव्ह मॅरेज करण्याची इच्छा असणार्‍यांसाठी अच्छे दिन येणार आहेत. आरोग्यामुळे थोडे चिंतेत राहाल.

मकर :
मकर राशीच्या जातकांना करियर आणि व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत आहेत. एप्रिल ते जून दरम्यान नोकरी बदलण्याचे योग आहेत. पैशाच्या बाबतीत भाग्य उजळणार आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत घर किंवा गाडी खरेदी करण्याचा योग आहे.

एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत पैशाच्या बाबतीत स्थिती अतिशय खराब राहिल. कौटुंबिक जीवनात थोडा दिलासा मिळेल. विवाहबाह्य संबंधामुळे गृहक्लेश वाढू शकतात.

कुंभ :
कुंभ राशीसाठी हा महा योगायोग अशुभ स्थिती निर्माण करणार आहे. करियर किंवा व्यवसायात छोटी चूक सुद्धा खुप मोठे नुकसान करू शकते. पैशाच्या बाबतीत सुद्धा समस्यांना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढू शकतात. गुंतवलेले पैसे बुडू शकतात.

यादरम्यान केलेली गुंतवणूक येणार्‍या काळासाठी लाभदायक ठरू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहिल. घरातील सर्व सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. आरोग्याच्या बाबतीतही कोणत्याही समस्या येणार नाहीत.

मीन :
शनी आणि गुरू हे दोन ग्रह मीन राशीच्या 11 स्थानात जवळपास पूर्ण वर्ष राहणार आहेत. यामुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीत निश्चित लाभ होईल. करियर आणि व्यवसायात सुद्धा प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग आहे.