तलावाच्या परिसरात फिरण्यासाठी गेलेली प्रसिद्ध अभिनेत्री बेपत्ता, नावेमध्ये 4 वर्षीय मुलगा एकटाच सापडला ! अद्यापही शोध सुरूच

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल चकित करणारा प्रकार समोर आला आहे. तिनं एक नाव भाड्यानं घेतली होती आणि मुलासह फिरायला गेली होती. अशी बातमी आहे की, अॅक्ट्रेस तलावात फिरायला गेली होती आणि तिथेच बेपत्ता झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूची शंका व्यक्त केली गेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सारेच हैराण झाले आहेत. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचं नाव नया रिवेरा (Naya Rivera) आहे. अद्याप अभिनेत्रीचा तपास सुरू आहे. पोलिसांना नयाचा मुलाग विचित्र अवस्थेत सापडला आहे. तलाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध सुरू आहे.

नेमंक काय घडलं ?

समोर आलेल्या माहितीनुसार नया बुधवारी (8 जुलै) दुपारी 3 तासांसाठी एक नाव भाड्यानं घेऊन तलावात फिरण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत तिचा 4 वर्षांचा मुलगा होता. 3 तास उलटूनही जेव्हा नाव परत आली नाही तेव्हा तिथला स्टाफ त्या नावेपर्यंत पोहोचला. कॅलिफोर्नियाच्या पीरू लेक मध्ये त्यांना नयाचा मुलगा जोसे तो भेटला. नया बेपत्ता होती. असं सांगितलं जात आहे की, ती मुलासोबत स्विमिंग करत होती परंतु मुलगाच फक्त नावेपर्यंत पोहोचू शकला.

नयाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक हॉलिवूड सिनेमात काम केलं आहे. नया तिची हिट म्युझिकल सीरिज Glee मुळं खूप फेमस झाली होती.