विविध मागण्यांसाठी होमगार्डसचा गणेशोत्सव बंदोबस्तावर बहिष्कार

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन

होमगार्डसला वर्षभर काम असावे, सेवेतून बाद केलेल्या होमगार्डना पुन्हा सेवेत घ्यावे, मानधनात वाढ करावी, वयोमर्यादा ६५ पर्यंत करावी, पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी होमगार्डसने गणपती बंदोबस्तावर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कारामुळे पोलीस दलावर बंदोबस्ताचा ताण येणार आहे.
[amazon_link asins=’B01LZE2VBG,B00Z46HHDI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’95c26df3-b7de-11e8-85d9-8dd7f0615d17′]

कुठल्याही उत्सवात पोलिसांच्या बरोबरीने होमगार्डस सर्वत्र काम करतात. त्यांना मिळणारे मानधनही अत्यंत तुटपुंजे असते. तसेच वर्षभरात त्यांना केवळ ९० ते १०० दिवसच रोजगार मिळतो, वर्षातील इतर दिवशी उदरनिर्वाहासाठी त्यांना कुठेतरी दुसरा कामधंदा बघावा लागतो. मध्य प्रदेशसह इतर राज्यातील होमगार्डस शासनाकडे नियमित झालेले आहेत. त्यांना मानधनाऐवजी वेतन देण्यात येते. मात्र महाराष्ट्रात त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर व्हावा या मागणीसाठी त्यांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. होमगार्डसच्या या बहिष्कारामुळे सणासुदींच्या दिवसात पोलिसांवर मात्र ताण येणार आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.