Home Remedies | चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका करायचीय?; मग जाणून घ्या ‘हे’ 5 घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Home Remedies | सध्या उन्हाळ्याचा चटका सुरू आहे. या हंगामात चेहरा जपायचा असतो. त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेच्या समस्या जाणवतात. तसेच दुसरीकडे पाहायलं की हवामान काहीही असो मुरुम, फोड, पिंपल्स (Acne, Blisters, Pimples) आणि त्यामुळे चेहऱ्यावर डाग येणे सामान्य झालं आहे. मुरुम आणि काळे डाग आपल्या चेहऱ्यावर सतत येत असतात. दरम्यान या समस्या दूर करण्यासाठी घरच्या घरी खास उपाय (Home Remedies) आहेत. हे उपचार केल्याने तुम्ही पिंपल्स आणि काळे डाग यापासून सुटका मिळवू शकणार आहात. याबाबत जाणून घ्या (How To Get Rid Of Pimples).

 

पिंपल्स / मुरुमांच्या डागांसाठी घरगुती उपाय काय? (Home Remedies For pimples And Acne)

1. ग्रीन टी (Green Tea) –
या उपायासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या बॅग्स लागतील. ग्रीन टी पाण्यात टाकून चहा तयार करा आणि नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवण्यासाठी ठेवा. पूर्णपणे गोठल्यानंतर दिवसातून दोनदा या बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्याला मसाज करा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स (Anti-Oxidants) तुम्हाला पिंपल्स आणि डार्क मार्क्सपासून मुक्त होण्यास मदत करतात (Home Remedies).

 

2. मेथी (Fenugreek) –
मेथीच्या दाण्यांमध्ये दाहकता कमी करणारे गुणधर्म असतात जे चेहऱ्यावर मुरुम, ब्लॅकहेड्स आणि इतर स्कीन इन्फेक्शना (Blackheads And Skin Infections) रोखतात. यासाठी मेथीचे दाणे एका भांड्यात भिजवून घ्या आणि सुमारे 5 तासांनंतर बारीक पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये गुलाबजल मिसळून चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा.

 

3. एलोवेरा जेल (Aloe Vera Gel) –
एलोवेरा जेल त्वचेला थंड ठेवण्यासाठी ओळखलं जातं. ते थेट चेहऱ्यावर लावता येतं. एलोवेरा जेलने दररोज चेहऱ्याला हलके मसाज करा, तुम्हाला काळे डाग हलके होताना दिसतील. जर कधी पुरळ उठला तर तुम्ही त्यावर एलोवेरा जेल देखील लावू शकता.

4. लस्सी (Lassi) –
चेहऱ्यावरून पुरळ निघून गेले असले तरी डाग राहतात. तर चेहऱ्यावरील हे काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही लस्सीचा वापर करू शकता. लस्सी मध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड (Lactic Acid) आढळतात. यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि डाग कमी होतात.

 

5. व्हिटॅमिन सी (Vitamin C) –
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. मुरुमांचे डाग दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी प्रभावी आहे. तुम्ही व्हिटॅमिन सी सीरम किंवा लिंबूवर्गीय फळांचा रस चेहऱ्यावर लावू शकता. तुम्हाला हवं असल्यास या फळांपासून फेस पॅक किंवा फेस मास्क बनवा आणि तो चेहऱ्यावर लावा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Home Remedies | home remedies for acne and dark spots on face

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Male Fertility | इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचा गरजेपेक्षा जास्त वापर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर करू शकतो परिणाम, जाणून घ्या कसा

 

Weight Loss Tips | पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपयोगी पडतील ‘हे’ 7 आयुर्वेदिक उपाय; जाणून घ्या

 

Health Tips | उन्हाळ्याच्या दिवसात नाकातून रक्त येतेय?; नका करु काळजी, ‘हे’ करा घरगुती उपाय