हनिमूनसाठी परदेशी जोडप्याने संपूर्ण भारतीय ट्रेनच केली बुक!

ADV
 नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन
खरे तर भारतीय जोड्या हनिमून करिता डुबी , स्वित्झर्लंड तसेच परदेशातील देशांना जाणे पसंत करतात पण एका परदेशातील जोडप्याने चक्क भारताची सम्पूर्ण ट्रेनच हनिमून करिता बुक केली आहे.  संपूर्ण ट्रेन बुक करण्यामागचे कारण काय असावे. तर या दोघांनी ही ट्रेन हनिमूनसाठी बुक केली आहे. दक्षिण रेल्वेच्या सालेम विभागाने नीलगिरी माऊंटन रेल्वेची विशेष चार्टर्ड सेवा पुन्हा सुरु केली असून हे परदेशी जोडपे पहिले प्रवासी ठरले आहेत.

[amazon_link asins=’B078TF9V6L,B077XXRDJM’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7440cdb8-ade5-11e8-b411-07c0cbc80421′]

काही दिवसापूर्वी  ब्रिटनमध्ये विवाहबद्ध होऊन भारतात हनिमूनसाठी आलेल्या या परदेशी जोडप्याने नीलगिरी माऊंटन रेल्वेची संपूर्ण ट्रेन बुक केली होती. ग्राहॅम विलियम आणि सिल्विया प्लासिस असे या नवविवाहीत जोडप्याचे आहे. नीलगिरी हे तामिळनाडूतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या परदेशी जोडप्याने निलगिरीच्या सुंदर पर्वतरांगांचा आनंद घेताना एकांत मिळावा यासाठी ही तीन डब्ब्यांची संपूर्ण ट्रेन बुक केली आहे.
त्यांनी रेल्वेच्या आयआरसीटीसी मार्फत ही संपूर्ण ट्रेन बुक केली होती. मेट्टपालयम ते ऊटी या ४८ किलोमीटरच्या एकमार्गी प्रवासासाठी या जोडप्याने २.५० लाख रुपये मोजले. १४३ प्रवासी क्षमता असलेल्या या ट्रेनमध्ये चालक सोडल्यास ग्राहॅम आणि सिल्विया दोघेचजण होते. साडेपाच तासांच्या प्रवासात ही ट्रेन एकूण १३ बोगदे आणि जंगलामधून जाते.

‘ही’ अभिनेत्री साकारणार आता नवीन शनाया

ऊटी येथे उतरल्यानंतर या प्रवासात निसर्गाचे अनोखे रुप पाहायला मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ही ट्रेन सकाळी ९.१० मिनिटांनी मेट्टपालयम येथून निघाल्यानंतर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ऊटी येथे पोहोचली. कुन्नूर रेल्वे स्टेशन आणि ऊटी येथे उतरल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दोघांचे स्वागत केले. नीलगिरी माऊंटन रेल्वेचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये समावेश होतो.