फक्त एका फेक कॉलनं चोरटयांनी केली महिलेची तब्बल 240 कोटींची फसवणूक

हॉंगकॉंग : वृत्तसंस्था –  हॉंगकॉंग देशात कधीच अशी घटना घडली नाही ती सध्या घडली आहे. तर काही अज्ञातांनी एका श्रीमंत महिलेकडून तब्बल २४० कोटी रुपये लुटले आहे. असा एक धक्कादायक घोटाळ्याचा प्रकार घडला आहे. तेथील काही चोरटयांनी एका ९० वर्षीय महिलेला ३२ मिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल २४० कोटी रुपयाची फसवणूक केली आहे. या प्रकरणावरून साउथ पोलिसांनी एका १९ वर्षीय विद्यापीठातील विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. फोनवरून घोटाळा करून एका बँक खात्यामधून तब्बल ८ कोटी रूपये जप्त केले आहे. परंतु, फोन स्कॅमर्सनी उर्वरित रुपये गडप केले आहे.

अधिक माहितीनुसार, येथील महिलेला एक फोन आला होता आणि एका व्यक्तीने तिला तो सरकारी अधिकारी असल्याचे म्हटले, तर महिलेला सांगण्यात आले होते की, त्यांच्या आयडेंटिटीचा वापर काही खतरनाक लोक करत आहेत आणि त्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यानंतर त्या अज्ञातांनी महिलेला पैसे हस्तांतरण करण्यास सांगितले. जेणेकरून हे तपासता यावं की, त्यांचा पैसा बेकायदेशीर तर नाही ना. तसेच महिलेला सांगण्यात आले होते की, चीनमधील एक गंभीर गुन्हेगारी केसमध्ये त्यांच्या पैशांचा वापर केला जात आहे. असे ऐकल्यानंतर ती महिला चांगलीच घाबरली होती. त्यावेळी तिला म्हटलं, काळजी करण्याची आवश्यकता नाही आणि त्यांचा सर्व पैसा चौकशीनंतर परत पाठवला जाईल. जेव्हा असं काही झालं नाही तेव्हा त्यांना लक्षात आले. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

या दरम्यान, त्यांनी लगेच पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनुसार, काही दिवसांआधी प्लंकेट रोडवरील या महिलेच्या घरी एक विद्यार्थी आला होता. या विद्यार्थ्याने महिलेला संवाद करण्यासाठी फोनही दिला होता. याच क्रमांकावर फोन स्कॅमरने या महिलेला फोन केला होता. या महिलेने त्यानंतर तब्बल २३९ कोटी रूपये तीन अकाउंटमध्ये जमा केले होते. महिलेने यासाठी आपल्या अकाउंटमधून ५ महिन्यात ११ वेळा ट्रान्झॅक्शन (व्यवहार) केले होते या महिलेला जेव्हा लक्षात आलं की तिची फसवणूक झाली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.