20-40 रुपये नाही, 82 हजार रुपये किलोची भाजी ! जी भारतात पिकवली जाते अन् परदेशात खाल्ली जाते

औरंगाबाद : 20-40 रुपये नव्हे, 82 हजार रुपये किलोची भाजी! जी भारतात पिकवली जाते आणि परदेशात खाल्ली जाते. तुम्हाला काय वाटतं? आम्ही मस्करी करत आहोत? कुणालाही असे वाटू शकते. जर तुमच्याकडून कुणी भाजीवाल्याने एक किलो भाजीसाठी 40 रुपयांपेक्षा जास्त पैसे मागीतले तर तुम्ही ती भाजी घेण्याचे टाळता. परंतु, खरोखर 82 हजार रुपए किलोची भाजी प्रत्यक्षात मिळते. ही भाजी जर्मनी आणि ब्रिटनमध्ये खुप चवीने खाल्ली जाते.

ही भाजी बिहारच्या औरंगाबादमध्ये उगवली जाते. ही जगातील सर्वात महाग भाजी आहे. तिचे नाव आहे हॉप शूट्स (HOP SHOOTS). एक किलो हॉप शूट्सची किंमत अंतरराष्ट्रीय बाजारात 1000 यूरो आहे. तर भारतीय रूपयात ही किंमत 82,000 रुपये होते. या भाजीबाबत खुपच कमी लोकांना माहिती आहे. कारण ही भाजी सामान्य भाजीवाल्याकडून विकणे तर दूर, कधी दिसत देखील नाही. बिहारच्या नवीनगर विभागातील करमडीह गावात ही भाजी पिकवली जाते.

औषध निर्मितीसाठी उपयोगी
हॉप शूट्स नावाच्या या भाजीचा वापर अँटिबायोटिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. विशेषकरून टीबीची औषधे बनवण्यात ती वापरली जाते. तिच्या फुलांपासून बिअर बनवली जाते. तिच्या फुलांना हॉप कोन्स म्हटले जाते. उर्वरित तन भाजी म्हणून सेवन केले जाते. हॉप शूट्स भाजीचे लोणचे सुद्धा बनवले जाते. ते सुद्धा खुप महाग असते. युरोपमध्ये हॉप शूट्स भाजीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. वंतर ऋतुमध्ये तिची मागणी जास्त असते. भारत सरकार या भाजीवर विशेष रिसर्च करत आहे. वाराणसी येथील भारतीय भाजी संशोधन संस्थेत या भाजीच्या शेतीबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे.