2 जून राशिफळ : मंगळवार ‘या’ 6 राशींसाठी ठरेल ‘फलदायी’, नोकरीत होईल ‘धनलाभ’

मेष
आजचा दिवस सामान्य आहे. खूप चिंताग्रस्त राहिल्याने निराशा व आळस जाणवेल. परंतु, दुपारनंतर उर्जा परत येईल. खर्च कमी होईल. चिंता कमी होतील. कामासाठी चांगला दिवस आहे. कठोर परिश्रम केल्यास कुटुंबातील तणाव कमी होईल. प्रेमसंबंधात अडचणी जाणवतील. विवाहितांना चांगले परिणाम मिळतील.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. व्यक्तिमत्त्वही आकर्षक राहील. कुटुंबातील मोठ्यांशी एखाद्या गोष्टीवर चर्चा होईल. बिघडलेले आरोग्य चिंतेचे कारण ठरेल. उत्पन्न ठीक होईल. प्रेमसंबंधात आनंद मिळेल. नवीन योजना तयार कराल. कुटुंबातील सदस्य आपले समर्थन करतील. ते उत्पन्न वाढविण्यासाठी मदत करतील. विवाहितांसाठी कमजोर दिवस आहे.

मिथुन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात चांगले परिणाम मिळतील. कामात झोकून दिल्याने सहकार्‍यांचेही कौतूक होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंब तुमचे काम वाढविण्यासाठी सहकार्य करेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. परदेशातून फायदा होईल. खर्च अधिक होईल. उत्पन्न सामान्य राहील.

कर्क
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील तरुण सदस्यांसोबत बराच वेळ घालवाल. मित्रांशी फोनवर मनमोकळ्या गप्पा माराल. आजचा दिवस एक अद्भुत दिवस असेल. आरोग्य मजबूत होईल. कामात यश मिळेल. नोकरीतील अडचणीपासून सुटका होईल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक वातावरणही चांगले राहील. उत्पन्नही चांगले होईल.

सिंह
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. दुपारपर्यंत पूर्ण आत्मविश्वासाने काम कराल. परंतु दुपारनंतर कामात काही अडचणी येतील. परंतु यश मिळविण्यासाठी खूप प्रयत्न कराल. व्यवसायातही चांगला फायदा होईल. नोकरीत चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक बोलून वैयक्तिक जीवन खराब करू नका. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे. आरोग्य कमजोर राहू शकते.

कन्या
आजचा दिवस चांगला आहे. संध्याकाळी सुग्रास जेवणाचा आनंद घ्याल. कामात बुद्धिमत्तेचा पूर्ण वापर कराल. व्यवहार कौशल्याने सर्वांवर छाप सोडाल. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. व्यवसायासाठी दिवस प्रगतीचा आहे. कुटुंबात काही अडचणी येतील. विवाहितांचे जीवन आनंदी राहील. प्रेमसंबधात आव्हानांचा सामना करावा लागेल.

तुळ
आजचा उत्तम आहे. कौटुंबिक जीवनात जवळीक वाढेल. जीवनातील जोडीदाराबरोबर बराच वेळ घालवाल. कुटुंबातील तणाव वाढत जाईल, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तीक्ष्ण बुद्धीचा वापर केल्यास व्यवसायात फायदा होईल.

वृश्चिक
आजचा दिवस खूप चांगला आहे. भाग्याची साथ लाभल्याने कमी प्रयत्नांत अनेक कामे मार्गी लावाल. कामात आनंददायक परिणाम मिळतील. चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसायासाठी दिवस उत्तम आहे. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. कुटुंबसुद्धा तणावातून बाहेर पडून शांतीच्या मार्गावर येईल. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. प्रिय व्यक्तीसोबत मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल.

धनु
आज दिवस खूप चांगला आहे. खूप व्यस्त रहाल. कामात पूर्ण लक्ष दिल्याने चांगले परिणाम मिळतील. कुटुंबाचीही पूर्ण काळजी घ्याल. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन घरगुती खर्च कराल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. वैवाहिक जीवनात तणावातून मुक्ती मिळेल. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. व्यवसायासाठी दिवस सामान्य आहे. कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. मानसिकदृष्ट्या मजबूत रहाल. धार्मिक कामात वेळ घालवाल. मानसिक शांतता लाभेल. छोट्या गोष्टींवरूनही राग येऊ शकतो, यासाठी काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात चढ-उतार राहील. प्रेमसंबंधात चांगले परिणाम मिळतील. नोकरीसाठी दिवस चांगला आहे. चांगल्या वागणुकीचा फायदा अनेक ठिकाणी मिळेल.

कुंभ
आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाच्या सुरूवातीस अनावश्यक काळजी वाटेल. यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशक्तपणा जाणवू शकतो. कामात व्यत्यय येईल. मन कोणत्याही कामात लागणार नाही. मात्र, दुपारी परिस्थितीत पूर्णपणे बदलेल. मानसिक ताणही नाहीसा होईल. कुटुंब तुमच्या बाजूने राहील. खर्च वाढेल. परंतु उत्पन्नही चांगले राहील. प्रेमसंबंधासाठी दिवस सामान्य आहे. प्रिय व्यक्तीसोबत अनेक गोष्टीवर चर्चा कराल.

मीन
आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदाराबरोबर वेळ घालवाल. मनातील सर्व गोष्टी त्यांच्यासमोर व्यक्त कराल. ज्यामुळे नाते घट्ट होईल. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. उत्पन्न वाढल्यामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबातील तरुणांशी प्रेमाने वागाल. प्रेमसंबंधासाठी दिवस कमजोर आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like