12 जून राशीफळ : शुक्रवारचा दिवस ‘या’ 6 राशीसाठी ‘शुभ’, मिळेल भाग्याची ‘साथ’

मेष
आजचा दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. मानसिक ताणतणाव संपेल. आरोग्य चांगले राहील. कामात खूप चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनात प्रेम राहील. प्रेमसंबंधात दिवस कठीण जाईल. आपण आज मोबाईल आणि सोशल मीडियावर अधिक व्यस्त राहाल.

वृषभ
आजचा दिवस चांगला आहे. कामाकडे पूर्ण लक्ष द्याल आणि कामासह कुटूंबालाही महत्त्व द्याल. आरोग्य बळकट होईल. मन आनंद होईल. इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक जीवन प्रेमपूर्ण राहील. प्रेमसंबंधात आनंद देणारे परिणाम मिळतील. प्रॉपर्टीशी संबंधित फायदा होईल.

मिथुन
आजचा दिवस उत्तम आहे. भाग्याची साथ लाभेल आणि वडिलांकडून पैसे मिळतील. खर्च वाढेल, त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कामासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कामात अडथळा येऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनासाठी दिवस सामान्य आहे. प्रेमसंबंधात अधिक प्रयत्न करावे लागतील. कारण प्रियव्यक्ती नाराजी व्यक्त करू शकते.

कर्क
आजचा दिवस कमजोर आहे. मानसिकदृष्ट्या खूप व्यस्त राहाल. एकाच वेळी बर्‍याच गोष्टी करणे आवश्यक आहे. यामुळे दबाव राहील. परंतु उत्पन्न वाढेल. खर्च कमी होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी राहील. प्रेमसंबंधात रोमान्स राहील. मनोबलमुळे कामे वेळेत पूर्ण कराल.

सिंह
आजचा दिवस सामान्य आहे. कौटुंबिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न कराल. परिस्थिती चांगली राहील. प्रेमसंबंधात एकमेकांबद्दल थोडी नाराजी राहू शकते. परस्पर चर्चेतून प्रकरण सोडवा. कामात खूप चांगले परिणाम मिळतील, परंतु काम चालू ठेवावे लागेल, तरच कामे पूर्ण होतील. अन्यथा काही अडचणी उद्भवतील. आरोग्य सामान्य राहील.

कन्या
आजचा दिवस थोडा आव्हानात्मक आहे. कामात अडथळा येऊ शकतो. विरोधक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांना यश येणार नाही. प्रेमसंबंधात दिवस आनंदी जाईल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. कामात बुद्धिचा वापर कराल. चांगले फायदे होतील.

तुला
आजचा दिवस शुभ आहे. उत्पन्न वाढेल. प्रेमसंबंधात प्रेम वाढेल. तणावग्रस्त परिस्थितीतून बाहेर आल्यावर विवाहितांचे घरगुती जीवनही आनंदी होईल. कुटुंबातील सदस्य आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील. कामात थोडी निराशा असू शकते. परंतु चांगले काम कराल.

वृश्चिक
आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्याल. त्यांच्या कामांना पूर्ण वेळ द्याल. यामुळे वातावरण चांगले राहील. प्रॉपर्टीशी संबंधित फायदा होईल. वैवाहिक जीवनात प्रेम आणि रोमान्स राहील. प्रेमसंबंधात आनंददायी परिणाम मिळतील. आरोग्याबाबत जागरूक राहा.

धनु
आजचा दिवस सामान्य आहे. एखाद्या कामासाठी प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. घरचे जेवण वेळच्यावेळी सेवन करा. कामात धावपळ होईल. कौटुंबिक जीवनात थोडा कंटाळा राहील. प्रेमसबंधासाठी दिवस चांगला आहे.

मकर
आजचा दिवस चांगला आहे. सुग्रास भोजनाचा लाभ घ्याल. जीवनाचा आनंद घ्याल. करमणूक कराल. प्रेमसंबंधासाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवन चांगले राहील. मेहनत करूनही पदरी थोडी निराश येईल, पण धीर सोडू नका. खर्चामध्ये अचानक वाढ होऊ शकते.

कुंभ
आजचा दिवस उत्तम आहे. आश्चर्यकारक ऊर्जा दिसेल. प्रत्येक काम वेळेत पूर्ण करू शकाल. कुटुंबासमवेत बराच वेळ घालवाल. कुटुंबात आनंद राहील. मनोरंजन करण्यासाठी नवीन टीव्ही किंवा होम थिएटर खरेदी करू शकता. विवाहितांचे जीवन सामान्य राहील. प्रेमात आनंददायक परिणाम मिळतील. थोडा खर्च होईल.

मीन
आजचा दिवस थोडा कमजोर आहे. खर्च वाढेल. मानसिक ताण वाढेल. पायाला दुखापत होऊ शकते, सावधगिरी बाळगा. कामाच्या संदर्भात केलेले प्रयत्न चांगले राहतील. उत्पन्न वाढेल, परंतु खर्चाकडे लक्ष द्या. घरगुती जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात आनंददायी परिणाम मिळतील.