पुण्यात घरांच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य शासनाकडून काही काळापूर्वी नागरिकांना काही प्रमाणात घरांच्या किंमतीबाबत दिलासा देण्यात आला होता. आता मात्र, पुण्यामधील घरांच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. या अनुषंगाने संबंधित प्रस्ताव राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्यात एक संकट निर्माण झालं आहे.

मुंबई नंतर मोठं शहर असणाऱ्या पुण्याबाबत नोंदणी आणि मुंद्राक शुल्क विभागाने मागील वर्षभरात झालेल्या व्यवहाराच्या सरासरीनुसार नवे दर प्रस्तावित केले आहेत. याबाबतचा अहवाल नोंदणी महानिरीक्षकांकडून मंजुरीसाठी राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. राज्याने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर १ एप्रिल महिन्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. कोरोनामुळे राज्यावर पडलेला आर्थिक भार सुधारण्यासाठी अर्थातच बांधकाम क्षेत्रातील मागणी वाढवण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात सूट जारी केली होती. ही सवलत केवळ ३१ मार्चपर्यंतच आहे. काही काळापूर्वी या सवलतीचा लाभ अनेक लोंकानी घेतला आहे. ज्यामुळे राज्याचा महसूलही वाढला. मात्र, आता पुन्हा घरांच्या किंमती वाढणार आहेत.

दरम्यान, कोरोना टाळेबंदीत मागील वर्षी पुण्यात आणि ग्रामीण भागात रेडीरेकनच्या (वार्षिक बाजारमूल्य किंमत) या दरामध्ये काहीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्रआता राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याची चिन्ह दिसत असतानाच २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी पुनर्निर्देशकच्या (Redireckner) किमतीत ३ टक्के वाढ नोंदणी व मुंद्रांक शुल्क विभागाने (Department of Registration and Stamp Duty) प्रस्तावित केली आहे. या प्रस्तावाला राज्य सरकरकडून जर हिरवा कंदील मिळाला, तर १ एप्रिलपासून पुणे शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा घराच्या दरात वाढ होणार आहे. तसेच लॉकडाऊन काळात निंबंधक कार्यालयेही बंद होती. त्यामुळे १ एप्रिल २०२० पासून प्रस्तावित नवे दर लागू केले होते. परंतु सप्टेंबर महिन्यापासून नवीन दर लागू केले होते. आगामी काळात पुणे शहरात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यामुळे जमीनीच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.