59 चिनी अ‍ॅप बंद केल्यानं ‘ड्रॅगन’ला मोठा धक्का, मात्र भारतालाही फटका, जाणून घ्या

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुुरू आहे. चीनवर बहिष्कार घालण्याची मागणी करत भारतीयांनी संताप व्यक्त केला होता. याला प्रतिसाद देत लोकांनीही चिनी अ‍ॅप्स, मोबाईल आणि इतर सर्व गोष्टी वापरणे बंद केले. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही चीनच्या तब्बल 59 अ‍ॅप्सवर मंगळवारी बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बंदीचा फटका भारत आणि चीनला किती प्रमाणात बसू शकतो, याबाबत जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

1. बर्‍याच भारतीयांना चिनी अ‍ॅप्सद्वारे रोजगार देखील मिळाला असून, बर्‍याच लोकांसाठी संबंधित बंदी घातलेले अ‍ॅप्स कमाईचे साधनही बनले आहेत. व्हिडीओ तयार करून पैसे कमावत आहेत. म्हणजेच चीनसह भारतातील अनेक लोकांचेही मोठे नुकसान होणार आहे.

2. तरुण पिढी टिकटॉक या चिनी अ‍ॅपकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली. बरेच लोक टिकटॉकवर व्हिडिओ करून स्टार बनले आहेत.

3. चीनी कंपनी बाइटडान्स अ‍ॅप भारतातील सुमारे 119 दशलक्ष लोक वापरतात. या बंदीमुळे चीनचे नुकसान होईल, परंतु बर्‍याच भारतीयांसाठी टिकटॉक हे कमाईचे साधन बनले होते.

4. हॅलो अ‍ॅप हे भारतात खूप लोकप्रिय आहे. हे चिनी कंपनी बाइटडान्सचे उत्पादन आहे. सध्या भारतात हॅलो अ‍ॅप्सचे सुमारे 5 कोटी महिन्याला वापरकर्ते आहेत. याला बंदी घातल्याने भारतीय शेअरचॅट पुन्हा लोकांचे लक्ष वेधून घेईल.

4. लाईकीचे देशात एकूण 115 दशलक्ष वापरकर्ते आहेत. हे अ‍ॅप लोकप्रिय असून, टॉप-7 अ‍ॅप्सपैकी एक आहे. यामाध्यमातून व्हिडीओ बनवून पैसे कमावत होते. यावरही बंदी घातल्याने अनेक भारतीयांचे नुकसान होणार आहे.

5. यूसी ब्राऊझर हे अ‍ॅप चीनशिवाय उर्वरित सुमारे 1.1 अब्ज लोकांनी डाऊनलोड केले आहे. याचा निम्मा व्यवसाय फक्त भारतात होता.

6. चीनची मोबाईल निर्माता कंपनी शाओमी भारतात इतकी लोकप्रिय आहे की, त्या कंपनीने एक चतुर्थांशपेक्षा जास्त बाजारपेठ व्यापली. 2019 च्या तिसर्‍या तिमाहित शाओमीचे भारतात 26 टक्के वापरकर्ते होते. शाओमी वापरकर्ते आता मी कम्युनिटी आणि मी व्हिडिओ कॉल शाओमीसारखे अ‍ॅप्स वापरू शकणार नाही.

थोडक्यात, याचा भारतालाही आर्थिक फटका बसणार आहे. इथले लोक हॅलो, लाईकी, व्हिटोस, तिकिटलॉक, यूसी ब्राऊझरसारखे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतात, ज्यांना चीनकडून बरेच पैस मिळत होते.