मला, आयसोलेशनमध्ये असून करोनाची लागण झालीच कशी? ‘आशिकी’ फेम राहुलचा मुंबई महापालिकेबद्दल खुलासा

गेले काही दिवस आपल्या देशात कोरोनाचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढत आहे. सामान्य नागरिकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. असेच काहीतरी ‘आशिकी’ फेम राहुल रॉय सोबत घडले. राहुल रॉय ने त्याच्या इंस्टाग्राम वर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट केले आणि मग त्या पाठोपाठ काही धक्कादायक खुलासे केले.

File photo

राहुल रॉय १९९० मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. तो सतत त्याच्या सोशल मीडिया द्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतो. नुकतेच त्याने कोरोना पॉसिटीव्ह आल्याची पोस्ट त्याच्या इंस्टाग्राम वर पोस्ट केली आणि त्या खाली भले मोठे कॅप्टिव लिहीत मुंबई महानगर पालिकेच्या डॉक्टर्स बद्दल काही धक्कादायक खुलासे केले.

झाले असे कि राहुल आणि त्याच्या परिवार पूर्णपणे आयसोलेशन मध्ये असून देखगील त्यांचा कोरोना रिपोर्ट कोरोना पॉसिटीव्ह आला. या मागचे तथ्य राहुल ला समजले नाही आणि तेव्हाच त्याच्या बहिणीचा आणि मेहुण्याचा कोरोना रिपोर्ट देखील पॉसिटीव्ह आला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याची बहीण आणि मेहुणा हे योग अभ्यासक असून ते देखील पूर्णपणे आयसोलेशन मध्ये होते. मग जर राहुल रॉय चा सर्व परिवार आयसोलेशन मध्ये होता, तर मग त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आले तरी कशे?

पुढे राहुल असं देखील म्हणाला कि BMC चे डॉक्टर्स त्याला अनेक प्रश्न विचारात आहेत ज्याचा कोरोना किंवा त्याच्या आरोग्याशी काहीही संबंध नाही आहे. इंस्टाग्राम पोस्ट च्या खाली भले मोठे कॅपशन लिहून राहुल ने हे त्याच्या चाहत्यांसोबत व्यक्त केले.

राहुल म्हणाला, “आयसोलेशनचा १९ वा दिवस. माझी करोनाची गोष्ट, करोनाचा एक रूग्ण माझ्या फ्लोअरवर आढळल्याने २७ मार्च रोजी माझा फ्लोअर सील करण्यात आला. गेल्या १४ दिवसांपासून आम्ही होम क्वारंटाइन आहोत. मला आणि माझ्या कुटूंबाला ११ एप्रिल रोजी दिल्लीला जायचे होते, म्हणून आम्ही ७ एप्रिल रोजी मेट्रोपोलिस लॅबमधून आरटीपीसीआर चाचणी केली. तर १० एप्रिल रोजी माझ्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजले. आम्हाला कोणतीही लक्षणे नव्हती, आणि त्याच दिवशी आम्हाला कळले की बीएमसीचे अधिकारी संपूर्ण सोसायटीची करोना चाचणी करत आहेत, म्हणून त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा करोना चाचणी करण्याचे ठरवले. आम्ही अँटीजेन चाचणी केली. तर, आमच्या सगळ्यांची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्हा आरटीपीसीआरची चाचणी करण्यात आली, ज्याचे नमुने हे उपनगरीय प्रयोगशाळेत देण्यात आले. मात्र, मला अद्यापही चाचणीचा अहवाल मिळालेला नाही.पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना आयसोलेशन फॉर्मवर सही करण्यास भाग पाडलं, माझे घर सॅनिटाइज केले. डॉक्टर काहीही प्रश्न विचारत होते, आमचा कौटुंबिक व्यवसाय काय आहे? माझं ऑफिस कुठे आहे? त्याचा आणि याचा काय संबंध मला माहित नाही. मला रुग्णालयात क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला, तर मी म्हणालो आम्हाला कोणतीही लक्षण नाहीत. तर त्यांनी आम्हाला ऑक्सिजन लेव्हलचा चार्ट बनवायला सांगितला आणि काही औषध घेण्यास सांगितले, ब्रेन स्ट्रोकमुळे मी जेव्हा पासून रुग्णालयातून आलो तेव्हा पासून मी त्याच गोळ्या घेत आहे. मला माहित आहे की करोना अजून आहे. परंतु मी आणि माझ्या कुटुंबीयांना घरातून बाहेर निघाल्या शिवाय, कोणाला न भेटता करोनाची लागण कशी झाली? मला याचं उत्तर कधी मिळणार नाही? माझी बहिण प्रियांका ही एक योगिनी आहे. तिने श्वास घेण्याच्या प्राचीन पद्धतींचा अभ्यास केला आहे. ती तर गेल्या ३ महिन्यांपासून घरातून बाहेर पडलेली नाही, तर तिचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह कसा आला. ”

आता काय खरे आणि काय खोटे हे मुंबई महानगर पालिकेच्या डॉक्टरांनाच माहिती असं देखील राहुल म्हणू इच्चीत होता हे त्याच्या पोस्ट्स वरून दिसले.

राहुल रॉय चे अन्य काही छायाचित्रे :