फायद्याची गोष्ट ! ‘हा’ व्यवसाय सुरू करा अन् मिळवा दरमहा लाखो रुपये !

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोणताही धंदा, व्यवसाय सुरु करायचा साधा विचार जरी केला तर भांडवल, नफा-तोटा यांसारखे प्रश्न समोर येतात. मात्र, असा एक व्यवसाय आहे, तो सुरु केल्यास तुम्हाला दरमहा लाखो रुपये मिळू शकतील. त्यासाठी तुम्हाला डेअरी प्रॉडक्ट तयार करणारी कंपनी अमूलसोबत व्यवसाय करणे गरजेचे आहे.

अमूलसोबत व्यवसाय करताना लहान गुंतवणुकींमध्ये दरमहा नियमित गुंतवणूक करता येते. अमूलची फ्रँचायझी घेणे फायदेशीर आहे. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. या माध्यमातून तुम्ही फक्त 2 लाखांपासून व्यवसाय सुरू करू शकता. अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी खर्च सुद्धा जास्त नाही. तुम्ही 2 ते 6 लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायाच्या सुरूवातीला चांगला नफा मिळू शकेल. फ्रँचायझीद्वारे दरमहा सुमारे 5 ते 10 लाखांचा माल विकला जाऊ शकतो. हे संबंधित ठिकाणावर अवलंबून असते.

अशी घ्या फ्रेंचायझी…

अमूलकडून दोन प्रकारच्या फ्रेंचायझी दिल्या जात आहेत. सर्वात आधी आधी अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियोस्क फ्रँचायझी आणि दुसरे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर फ्रेंचायझी. पहिल्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर 2 लाख रुपये गुंतवावे लागतील आणि दुसर्‍या फ्रेंचायझी घेण्याचा विचार करत असाल तर 5 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये परत न करण्यायोग्य ब्रँडची सुरक्षा म्हणून द्यावी लागणार आहे.

जागेची गरज…

जर तुम्ही अमूलचे दुकान घेतले तर तुमच्याकडे 150 स्केअर फूट जागा असावी. त्याचवेळी अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रेंचायझीसाठी किमान 300 चौरस फूट जागा असणे गरजेचे आहे.

कमिशन किती?

अमूल उत्पादनांच्या एमआरपीची कमिशन देते. दुधाच्या पिशवीवर 2.5 टक्के, दुधाच्या उत्पादनांवर 10 टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रेंचायझीला रेसिपी आधारित आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 % कमिशन मिळते.