कामाची गोष्ट ! ओळखपत्राच्या ‘पुराव्या’ शिवाय काढता येतं ‘आधार’ कार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार आज सर्वात महत्वाचं कागदपत्र बनलं आहे. आयकर असा अथवा पॅन कार्डसाठी अर्ज करणं किंवा कोणतीही सरकारी अनुदान, आधारकार्ड अनिवार्य झाले आहे. पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र इत्यादी अधिकृत ओळखपत्रांचा आधार कार्ड तयार करण्यासाठी पुरावा द्यावा लागतो. परंतू यापैकी कोणताही पुरावा नसल्यास आधार कार्ड कसं काढायचं ?

UIDAI च्या आधार एनरोलमेंट फॉर्मनुसार जर एखाद्या व्यक्तीकडे पुरावा आवश्यक असलेले कागदपत्र नसेल तरी देखील तुम्ही अर्ज करु शकतात. त्यासाठी एक म्हणजे तुम्हाला एखाद्या परिचयदाता किंवा कुटूंबातील सदस्याची आवश्यकता असते.

कुटूंबातील सदस्याद्वारे आधार कार्डसाठी अर्ज करणे –
अधिकृत पुरावा नसला तरी देखील तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी तुमच्या कुटूंबातील त्या व्यक्तीचे नाव तुमच्या कुटूंबातील एखाद्या कागदपत्रावर असावे लागेल. उदाहरणार्थ. शिक्षापत्रिका. परंतू यासाठी अनिवार्य आहे की आधी कुटूंब प्रमुखाचे आधार कार्ड असणं. त्यानंतर तो प्रमुख कुटूंबातील सदस्यांचा परिचयदाता होऊ शकतो. परिचयदात्याने आपल्या ओळखपत्र सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही जेथे आधार काढतं आहेत तो सदस्य स्वत: केंद्रावर उपस्थित हवा. दोघांमध्ये नातं सांगणारे एखादे कागदपत्र हवे. हे नाते दाखवण्यासाठी काही कागदपत्रांची यादी सरकारने दिली आहे.

1. पासपोर्ट
2. मनरेगा जॉब कार्ड
3. जन्मदाखला
4. पेंशन कार्ड
5. आर्मी कँटीन कार्ड
6. पीडीएस कार्ड
7. ईएसआयसी मेडिकल कार्ड
8. केंद्र किंवा राज्य सरकारचं फॅमिली एन्टायटलमेंट कागदपत्र
9. रुग्णालयाचे डिस्चार्ज कार्ड
10. सरपंचाने दिलेले फोटो प्रमाणपत्र
11. फॅमिली एन्टायटलमेंट डॉक्युमेंट
12. खासदार,आमदार, नगरसेवक किंवा गॅजेटेड अधिकाऱ्यांद्वारे दिलेले फोटो प्रमाणपत्र
13. पोस्टाचे अ‍ॅड्रेस कार्ड

परिचयदाता म्हणजे कोण –
परिचयदाता म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीला रजिस्टरद्वारे अशा निवासीसाठी सत्याधारित प्रत देण्यास नियुक्त केले जाते ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही. याशिवाय परिचयदात्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच या व्यक्तीला आधार नोंदणी केंद्रात उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

Visit : Policenama.com