पाकिस्तानातुन ‘खर्‍याखुर्‍या’ नोटांसारख्या भारतात येतायत ‘नकली’ नोटा, ‘अशा’ तपासा तुमच्या 2000 व 500 रूपयाच्या नोटा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी म्हणजेच एनआयए नुकतेच भारतात नकली नोटा आल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानमधून नकली नोटा भारतात येणे सुरु झाले असून सुरक्षित नोटा चलनात आणल्यानंतर देखील नकली नोटांचा वापर कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नकली नोटा कशा पद्धतीने ओळखायचा हे सांगणार आहोत.

सध्या बाजारात सर्वात जास्त 500 रुपयांच्या नकली नोटा येत आहेत. तर 2000 रुपयांच्या नकली नोटांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात 500 रुपयांच्या नकली नोटांचा वापर हा 121 टक्क्यांनी वाढला आहे.

अशाप्रकारे ओळखा 2000 रुपयांची नकली नोट
२००० रुपयांच्या नोटेचा रंग हा मॅजेंटा असून नोटेच्या पुढील भागावर गांधीजी तर मागील भागावर मंगळयानाचा फोटो आहे.
1) नोटेला लाईटच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर 2000 रुपयांचा आकडा दिसेल.
2) देवनागरीमध्ये 2000 रुपये लिहिलेले आढळून येते.
3) सेंटरला महात्मा गांधी यांचा फोटो आहे.
4) लहान अक्षरांमध्ये आरबीआय आणि 2000 रुपये लिहिले आहे.
5) नोटेला हलकेच मोडले तर थ्रेडचा कलर हा हलकासा निळा झालेला दिसून येतो.
6) २००० या अंकाचा रंग बदलतो. हिरव्याचा रंग हलकासा निळा देखील होतो.
7) डाव्या बाजूला नोटेवर अशोक स्तंभ आहे.
8) डाव्या बाजूला आयताकार बॉक्समध्ये 2000 रुपये लिहिलेले आहे.

मागील बाजूस
1) नोटेचे छपाईचे वर्ष लिहिले आहे.
2) स्लोगनसह स्वच्छ भारत अभियानाचा लोगो लावलेला आहे.
3) सेंटरमध्ये भाषेचा पॅनल
4) मंगळयानाचा फोटो

दृष्टिहीनांसाठी ओळख
महात्मा गांधी यांचा फोटो, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खरबडीत आहे.

500 रुपयांची नोट कशी ओळखावी
1) नोटेला लाईटच्या समोर ठेवल्यानंतर तुम्हाला त्यावर 500 रुपयांचा आकडा दिसेल.
2) देवनागरीमध्ये 500 रुपये लिहिलेले आढळून येते.
3) जुन्या नोटेच्या तुलनेत महात्मा गांधींच्या फोटोमध्ये थोडे बदल करण्यात आले आहे.
4) नोटेला हलकेच मोडले तर थ्रेडचा कलर हा हलकासा निळा झालेला दिसून येतो.
5) नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे.
6) 500 या अंकाचा रंग बदलतो. हिरव्याचा रंग हलकासा निळा देखील होतो.
7) डाव्या बाजूला नोटेवर अशोक स्तंभ आहे.
8) डाव्या बाजूला आयताकार बिक्समध्ये ५०० रुपये लिहिलेले आहे.

मागील बाजूस
१) नोटेचे छपाईचे वर्ष लिहिले आहे.
२) स्लोगनसह स्वच्छ भारत अभियानाचा लोगो लावलेला आहे.
३) सेंटरमध्ये भाषेचा पॅनल
४) भारतीय झेंड्याबरोबर लाल किल्ल्याचा फोटो
५) देवनागरीमध्ये ५०० लिहिले आहे.

दृष्टिहीनांसाठी ओळख
महात्मा गांधी यांचा फोटो, अशोक स्तंभाचे प्रतीक, ब्लीड लाईन आणि ओळख चिन्ह खरबडीत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी