सावधान ! फोन सतत हँग होत असेल तर करा ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपला फोन अनेकदा स्लो होतो. फोन जुना झाल्यानंतर या समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवतात. त्याचबरोबर अनेकदा आपली महत्वाची कामे सुरु असताना आपल्याला हि समस्या प्रकर्षाने जाणवते. फोन अचानकपणे हँग होऊन बंद देखील पडतो. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला याविषयी सांगणार आहोत कि, स्लो झालेला तुमचा मोबाईल घरच्या घरी कसा रिपेयर करायचा.

खालील कृती वापरून करा मोबाईल रिपेयर

आजकाल फोन घेताना सर्वात आधी आपण त्याचे स्पेसीफिकेशंस चेक करत असतो. त्यामुळे भविष्यात तुम्हाला याचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर तो भविष्यात हँग होणार नाही. यासाठी अनेक प्रकार आहेत मात्र आम्ही तुम्हाला यापैकी एक प्रकार सांगणार आहोत. फोन हँग होण्याची अनेक कारणे आहेत ,मात्र प्रमुख कारण हे फोनमधील अ‍ॅप्सचे असणारे Cache हे होय. जर तुमचा फोन सुरळीत सुरु ठेवायचा असेल आर वेळोवेळी हे Cache तुम्हाला क्लियर करावे लागणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही फोन वापरात असताना बॅकग्राउंड अ‍ॅप बंद करावेत जेणेकरून तुमचा फोन स्लो होणार नाही.

त्याचबरोबर फोन गरम होऊ नये असे वाटत असेल तर तुमच्या मोबाईलला सपोर्ट होणारे अ‍ॅपच फक्त डाउनलोड करावेत. जास्त डाउनलोडींग करू नये. दरम्यान, तुमचा मोबाईल सारखाच हँग होत असेल आणि स्क्रीन ब्लँक होत असेल तर रॅम दररोज कमी करावे जेणेकरून तुमचे सर्व अ‍ॅप व्यवस्थित चालतील.

आरोग्यविषयक वृत्त