कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  प्रत्येक व्यक्तीसाठी रेशनकार्ड हे आधार कार्ड, पॅनकार्ड इतकेच महत्वाचे असते. प्रत्येक शासकीय कामासाठी आपल्याला नेहमी रेशनकार्डाची आवश्यकता भासते. अशा महत्वाच्या रेशन कार्डामध्ये पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असेल तर फार कष्ट घेण्याची गरज लागणार नाही. तसेच यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. कारण हे सर्व बदल आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीनेही करता येणार आहेत.

केंद्र सरकारने नुकतेच ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. रेशन कार्डमध्ये कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावाची नोंदणी करायची राहिली असल्यास ती कशी करायची, घरबसल्या रेशन कार्ड (Ration card) कसं अपडेट करायचं हे जाणून घेऊया.

रेशनकार्ड कसे कराल अपडेट

सर्वात आधी भारत सरकारच्या Www.pdsportal.nic.in या लिंकवर जा. त्यानंतर राज्यांची नावे असलेल्या टॅबवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर नवीन टॅबवर राज्यांची यादी येईल. तुम्ही ज्या राज्यात राहत आहात त्याची निवड करा. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यानंतर संबंधित राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. पहिल्या वेळेस वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यामध्ये जी माहिती भरायची आहे ती भरून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर याची एक प्रिंट तुमच्याकडे बाळगा.

अशाच पध्दतीने तुम्हाला मोबाईल क्रमांक (Mobile Number) देखील अपडेट करता येते. याकरिता सर्वात आधी nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर Update Your Registered Mobile Number हा पर्याय दिसेल. यात तुम्हाला कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटी जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो नंबर टाकावा लागणार आहे. हा क्रमांक टाकून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक अपडेट होऊ शकतो.