‘स्मार्टफोन’वर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे ‘त्रस्त’ आहात ? अशी मिळवा सुटका, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – स्मार्टफोन आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनले असून, आपल्या दैनंदिन जीवनातील बारीकसारीक नोंदींप्रमाणेच अत्यंत महत्त्वाची आणि खासगी माहितीही स्मार्टफोनमध्ये डेटारूपाने साठवलेली असते. कॉलिंग, टेक्सिंग यासोबतच नोट्स सेव्ह करण्यासारखी अनेक कामं युजर्स करत असतात. गुगल प्ले स्टोरवरून युजर्स अनेक अ‍ॅप इन्स्टॉल करत असतात. मात्र यामध्ये येणारे नोटिफिकेशन्स हे डोकेदुखी ठरतात. तुम्हीही स्मार्टफोनवर येणाऱ्या नोटिफिकेशनमुळे त्रस्त असाल तर खालील स्टेप्स फॉलो करून मिळवा सुटका.

असे करा स्मार्टफोनमधील नोटिफिकेशन मॅनेज –
अँड्रॉईड स्मार्टफोन अ‍ॅप ड्रॉर ओपन करा आणि अ‍ॅप सेटिंग्समध्ये जा.
तिथे नोटिफिकेशनचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
नोटिफिकेशन सेटिंग्समध्ये फेलियर नोटिफिकेशन, मेसेज नोटिफिकेशन, क्रिटिकल अ‍ॅप अलर्ट्स, मीडिया प्लेबॅक, ग्रुप नोटिफिकेशन आणि अदर्स सारखे पर्याय दिसतील. जे नोटिफिकेशन एडिट करायचं आहे त्यावर क्लिक करा.
हाइड अ‍ॅप बारमधून देखील नोटिफिकेशन नोटिफिकेशन इनेबल करता येतं.

आरोग्यविषयक वृत्त –